Difference between revisions of "Moodle-Learning-Management-System/C2/Courses-in-Moodle/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 | '''''Time''''' | '''''Narration''''' |- | 00:01 | '''Courses in Moodle''' वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आप...")
 
Line 125: Line 125:
 
|-
 
|-
 
| 04:40
 
| 04:40
| हे फिल्ड पर्यायी(ऑप्शनल) आहे आणि वेबसाईटवर ते kuthehi प्रदर्शित झाले नाही.
+
| हे फिल्ड पर्यायी(ऑप्शनल) आहे आणि वेबसाईटवर ते कुठेही प्रदर्शित झाले नाही.
 
मी हे रिक्त सोडत आहे.
 
मी हे रिक्त सोडत आहे.
 
|-
 
|-
Line 242: Line 242:
 
|-
 
|-
 
| 09:42
 
| 09:42
| ते काय आहेत ते पाहण्यासाठी आयकॉन्सवर halchal kara.
+
| ते काय आहेत ते पाहण्यासाठी आयकॉन्सवर हालचाल करा.
 
|-
 
|-
 
|09:46
 
|09:46

Revision as of 11:18, 10 March 2019

Time Narration
00:01 Courses in Moodle वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत : course कसा तयार करावा आणि course वर क्रिया कशा कराव्यात.
00:16 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे : Ubuntu Linux OS 16.04
00:24 XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, MariaDB आणि PHP

Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर

00:38 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही ब्राउजर वापरू शकता.
00:42 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात.
00:50 Moodle मध्ये categories कशा तयार कराव्या , ह्या ट्युटोरिअलच्या विद्यार्थ्यांना माहित असावे.
00:56 नसल्यास, कृपया ह्या वेबसाईटवरील संबंधित Moodle ट्युटोरिअल्स पहा.
01:03 ब्राउजरवर जा आणि तुमचा Moodle होमपेज उघडा.

खात्री करून घ्या की XAMPP service चालू आहे.

01:11 आपल्या admin username आणि password तपशीलासह लॉगिन करा.
01:16 आपण आता admin dashboard मध्ये आहोत.
01:19 डाव्या बाजूला नेव्हिगेशन मेनू उघडण्यासाठी ड्रॉव्हर मेनूवर क्लिक करा.
01:25 डाव्या बाजूला,Site Administration वर क्लिक करा.
01:29 Courses टॅबवर आणि नंतरManage courses and categories वर क्लिक करा.
01:36 लक्षात घ्या की, आपल्याकडे येथे फक्त एक category आहे, जीआहे Mathematics
01:41 आणि दोन subcategories : 1st Year Maths आणि 2nd Year Maths , जे आपण आधी तयार केले होते.
01:50 आता, "Mathematics अंतर्गत नवीन course तयार करू.
01:55 तर Create new course वर क्लिक करा.
01:59 आणि Add a new course स्क्रीनमध्ये, सर्व फिल्ड्स पाहण्यासाठी, वरील उजवीकडे Expand All वर क्लिक करा.
02:12 Course full name टेक्स्टबॉक्समध्ये आपण Calculus टाईप करू.
02:18 Course short name मध्ये, आपण पुन्हा टाईप करू Calculus.
02:24 Course short name हे breadcrumbs आणि course संबंधित ईमेलमध्ये वापरले जाईल.
02:31 हे course full name पेक्षादेखील भिन्न असू शकते.
02:35 Course Category हे Mathematics आहे, जसे आपण पाहू शकतो.
02:40 पुढील पर्याय आहे Course visibility. डिफॉल्टपणे Show निवडले आहे.
02:48 Visible सेटिंग हे,course इतर courses, सोबत दिसावा की नाही हे निर्धारित करते.
02:56 हिडन course हा केवळ त्यांच्यासाठी दृश्यमान आहे,ज्यांना course साठी असाइन केले आहे

जसे -Admin, Course creator, Teacher, Manager

03:08 आपण आत्तासाठी हे सेटिंग आहे तसे सोडून देऊ.
03:12 पुढे येते Course start date
03:16 जर course एखाद्या सेमिस्टरच्या सुरुवातीच्या तारखेप्रमाणे, एखाद्या विशिष्ट तारखेपासून सुरू झाला तर ते start date मध्ये निवडा.
03:25 ह्याचा अर्थ course start dateपर्यंत विद्यार्थ्यांना दिसणार नाही.
03:32 Course end date डीफॉल्टपणे, सक्षम केली आहे आणि कोर्स जेव्हा तयार केला गेला आहे त्याच तारखेस सेट केली जाते.
03:42 चेकबॉक्सवर क्लिक करून मी ते डिसेबल(अक्षम ) करते.

ह्याचा अर्थ असा होईल की course कधीच संपणार नाही.

03:51 तथापि, जर तिथे course साठी शेवटची तारीख असेल तर तुम्ही येथे चेकबॉक्स सक्षम करू शकता. मग तुमच्या गरजेनुसार तारीख निवडा.
04:02 महत्त्वपूर्ण टीप: 'end date निवडल्यानंतर विद्यार्थ्यांना course दिसणार नाही.

मी त्यास डिसेबल्ड (अक्षम)सोडेन.

04:13 Course ID number हा Category ID number च्या समान आहे.

Course ID number हा एक पर्यायी(ऑप्शनल) फिल्ड आहे.

04:22 ऑफलाईन courses सह admin users ना courseओळखण्यासाठी हे आहे.
04:28 जर तुमचे महाविद्यालय(कॉलेज)courses साठी IDs वापरत असेल तर आपण त्या course ID इथे वापरू शकता. हे फिल्ड इतर Moodle users ना दृश्यमान नाही.
04:40 हे फिल्ड पर्यायी(ऑप्शनल) आहे आणि वेबसाईटवर ते कुठेही प्रदर्शित झाले नाही.

मी हे रिक्त सोडत आहे.

04:49 पुढे Description च्या अंतर्गत आपण दोन फिल्ड्स पाहू शकता: Course Summary आणि Summary files.
04:59 Course summary हा एक पर्यायी परंतु महत्त्वपूर्ण फिल्ड आहे.

कारण जेव्हा user शोध घेतो तेव्हा Course summary टेक्स्टदेखील स्कॅन केली जाते.

05:13 येथे टॉपिकची नावे सूचीबद्ध करणे ही एक चांगली कल्पना आहे.

खालील टाईप करा: Topics covered in this Calculus course are: Limits,Graph of a function, Factorial

05:29 courses च्या सूचीसह Course summary देखील प्रदर्शित केली आहे.
05:35 कोर्स समरी फाईल्स ह्या Course summary files फिल्डमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे.
05:42 डीफॉल्टपणे,course summary files म्हणून फक्त jpg, gif आणि png file types ह्यांना अनुमती आहे.

मी हे वगळेन, कारण मी कोणतीही फाईल अपलोड करू इच्छित नाही.

05:57 Course format म्हणजे विद्यार्थ्यांसाठी संसाधने आणि क्रियाकलाप आयोजित करण्यासाठी मार्ग संदर्भित करते.
06:06 तिथे Format ड्रॉपडाऊ नमध्ये 4 पर्याय आहेत -

Single Activity Format, Social Format, Topics Format आणि Weekly Format.

06:20 तिथे courses आहेत जे आठवड्या आठवड्यातून चालतात.
06:24 जर तुमचा course' अशा प्रकारचा असेल तर Weekly'format निवडा.
06:30 Moodle हे course प्रत्येक आठवड्यासाठी एका स्पष्ट प्रारंभ तारीख(स्टार्ट डेट) आणि समाप्तीच्या तारीखेसह(एंड डेटसह)सेक्शन तयार करेल.
06:39 तिथे courses आहेत जे घटकानुसार (टॉपिकनुसार) चालतात.

जर तुमचा course ह्यासारखा असेल तर Topics format निवडा.

06:49 Moodle हे course च्या प्रत्येक topic साठी एक सेक्शन तयार करेल.
06:55 ह्या फिल्डसाठी डीफॉल्ट आहे Topics format.

आपण ते आहे तसे राहू देऊ.

07:03 डिफॉल्टपणे सेक्शनची संख्या 4 आहे.
07:07 जर तुमच्याकडे 4 घटकांपेक्षा कमी किंवा जास्तमध्ये विभागलेला course असेल तर आवश्यकतेनुसार हे फिल्ड बदला.

मी हा नंबर 5 निवडेन.

07:20 आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये इतर formats वर चर्चा करू.
07:25 बाकीचे पर्याय जसे आहेत तसे सोडून देऊ.

पृष्ठाच्या तळाशी खाली स्क्रोल करा आणि Save and display बटणावर क्लिक करा.

07:36 आपण Enrolled Users पेजवर पुनर्निर्देशित केले आहे.

आपण पुढील ट्युटोरिअलमध्ये user enrollment बद्दल शिकू.

07:46 आता आपण category Mathematicsअंतर्गत आपला पहिला course Calculus यशस्वीरित्या तयार केला आहे.
07:56 आपण ह्या course page वर असताना, लक्षात घ्या की, डावीकडील मेनू बदलला आहे.
08:03 डावीकडील नेव्हिगेशन मेनूमध्ये आपण तयार केलेल्या course शी संबंधित मेनूज आहेत.

ह्यात Participants, Grades इत्यादींचा समावेश आहे.

08:15 डाव्या बाजूला असलेल्या Calculus नावाच्या कोर्सवर(कोर्स नेम) क्लिक करा.
08:20 आपण पाहू शकतो की येथे 5टॉपिक्स(घटक)दृश्यमान आहेत. त्यांना Topic 1, Topic 2 अशी नावे देण्यात आली आहेत. पुन्हा लक्षात घ्या की आपण ह्यांना आधी 5 नंबर दिला होता.
08:34 पेजच्या वरील उजवीकडे असलेल्या गीयर (gear) आयकॉनवर क्लिक करा.
08:39 नंतर Edit settings वर क्लिक करा.

जेव्हा आपण हा course तयार केला तेव्हा आपण ज्या पेजवर होतो त्या पेजसारखे पेज हे उघडेल.

08:51 आपण ह्या पेजवरील आधीच्या सेटिंग्जमध्ये बदल करू शकतो.

मी Course start date 15 ऑक्टोबर 2017मध्ये बदलेन.

09:04 पेजच्या तळाशी खाली स्क्रोल करा आणि Save and display बटणावर क्लिक करा.
09:11 नंतर आपण गीयर(gear) मेनू अंतर्गत इतर submenus एक्सप्लोर करू.
09:17 आता आपण आपल्या course ची संरचना थोडी बदलू.
09:22 Site administration वर क्लिक करा.

Courses वर क्लिक करा आणि नंतर Manage courses and categories.

09:31 आपण तयार केलेले course पाहण्यासाठी Mathematics category वर क्लिक करा.

course च्या उजवीकडे 3 आयकॉन्सकडे लक्ष द्या.

09:42 ते काय आहेत ते पाहण्यासाठी आयकॉन्सवर हालचाल करा.
09:46 गीयर आयकॉन हे course एडिट करण्यासाठी आहे. delete किंवा trash आयकॉन हेcourse डिलीट करण्यासाठी आहे.
09:55 आणि आय(eye) आयकॉन course लपविण्यासाठी आहे.
10:01 तेच सूचित करण्यासाठी लपविलेल्या course कडे तिरपा डोळा (crossed eye) असेल.
10:07 आपण course settingsएडिट करण्यासाठी, कोर्सच्या नावाच्या उजवीकडील गियर(gear) आयकॉनवर क्लिक करू शकतो.
10:14 मी Course Summary सुधारित करू इच्छित आहे आणि विद्यमान टॉपिक्स Binomials जोडू इच्छित आहे. उर्वरित सेटिंग्ज तसेच राहू शकतात.
10:25 पेजच्या तळाशी खाली स्क्रोल करा आणि ह्यावेळी Save and return बटणावर क्लिक करा.
10:34 येथे तुमच्यासाठी एक छोटीशी असाईनमेंट आहे:category Mathematics अंतर्गत Linear Algebra एक नवीन कोर्स तयार करा.
10:44 आत्तासाठी course लपवा (हाईड करा).
10:47 खालील घटकांचा course summary: Linear equations, Matrices आणि Vectors मध्ये उल्लेख करा. Save and Return वर क्लिक करा.
11:00 ट्युटोरिअल थांबवा आणि असाईनमेंट पूर्ण झाल्यावर चालू ठेवा.
11:06 आता आपल्याकडे Mathematics अंतर्गत 2 courses आहेत : Calculus आणि Linear Algebra.
11:14 लक्षात घ्या की, आता courses च्या पुढे एक नवीन आयकॉन दिसत आहे.
11:20 courses च्या ऑर्डरची पुन्हा व्यवस्था करण्यासाठी अप आणि डाऊन एरोज आहेत.
11:26 ड्रॅग आणि ड्रॉप फिचरचा वापर करून आपण ऑर्डर बदलू शकतो.

Calculus course हलवून Linear Algebra course च्या वर ठेवू.

11:36 हे दोन्ही courses पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत.

म्हणून ते 1st Year Maths subcategory अंतर्गत हलवू.

11:47 ते निवडण्यासाठी 2 courses च्या डावीकडील चेकबॉक्स तपासा.
11:53 मग Move selected courses toमध्ये Mathematics / 1st year Mathsनिवडा.
12:02 आणि Move बटणावर क्लिक करा.
12:04 आपल्याला एक यशस्वी मेसेज मिळतो - Successfully moved 2 courses into 1st year Maths.
12:14 लक्षात घ्या की, Mathematics अंतर्गत courses ची संख्या 0 झाली आहे आणि 1st year Maths अंतर्गत 2 आहे.
12:24 1st year Maths sub-category वर क्लिक करा.
12:28 आपण ह्या subcategory अंतर्गत आपले courses पाहू शकतो.
12:33 ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
12:38 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो : course कसा तयार करावा

courses वर एडिट, मुव्ह इ. सारख्या क्रिया कशा कराव्यात?

12:50 तुमच्यासाठी येथे असाईनमेंट आहे:

subcategory 2nd Year Maths अंतर्गत subcategory 2nd Year Maths मध्ये 2 courses जोडा, ते म्हणजे

13:00 Multivariable calculus आणि Advanced Algebra.
13:06 अधिक माहितीसाठी ह्या ट्युटोरिअलच्या Code files लिंकचा संदर्भ घ्या.
13:12 15 ऑक्टोबर 2017 पासून सुरू होणारे courses एडिट करा.
13:18 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial प्रोजेक्टचा सारांश देतो. कृपया ते डाऊनलोड करून पहा.
13:26 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

13:36 कृपया ह्या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
13:40 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या मिशनवरील अधिक माहिती दाखवलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.

13:53 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana