Difference between revisions of "Moodle-Learning-Management-System/C2/Admin-dashboard/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "{| border=1 |'''Time''' |'''Narration''' |- | 00:01 | ''' Moodle''' मधील '''Admin’s dashboard ''' वरील स्पोकन ट्युटोरिअलम...")
 
 
Line 333: Line 333:
 
| स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
| स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.  
 
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.  
 
+
अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 13:20, 10 March 2019

Time Narration
00:01 Moodle मधील Admin’s dashboard वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत:

Admin’s dashboard वर विविध blocks Admin’s profile page आणि preferences कशी एडिट करावी.

00:22 हा ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरणार आहे:

Ubuntu Linux OS 16.04

XAMPP 5.6.30 मधून प्राप्त Apache, Ma riaDB आणि PHP

Moodle 3.3 आणि Firefox वेब ब्राउजर.

00:46 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही वेब ब्राउजर वापरू शकता.
00:50 तथापि, Internet Explorer टाळले पाहिजे कारण यामुळे काही डिस्प्ले विसंगती उद्भवतात.
00:59 या ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांच्या सिस्टमवर Moodle 3.3 इन्स्टॉल असले पाहिजे.

नसल्यास, कृपया या वेबसाइटवरील संबंधित Moodle ट्यूटोरियल पहा.

01:13 ब्राउजरवर जा आणि तुमचे moodle site उघडा. XAMPP service रन करीत आहे याची खात्री करा.
01:21 आपण केवळ शीर्षलेखांसह एक रिक्त पेज पाहू शकता. याचे कारण असे की आपण आपल्या इंस्टॉलेशनसाठी कोणतेही front page सेट केले नाही.
01:33 विंडोच्या वरच्या उजव्या कोपर्यात Log in लिंकवर क्लिक करा.
01:39 तुमचे admin username आणि password वापरून लॉगइन करा जे तुम्ही Moodle इन्स्टॉल कर्त्यावेळी दिले होते.
01:47 मी username म्हणून admin आणि password म्हणून Spokentutorial1@ प्रविष्ट करेल. नंतर Log in बटणवर क्लिक करा.
01:59 आता आपण ज्या पेजवर पाहतो त्याला dashboard म्हणतात.
02:04 आपण पाहु शकतो की dashboard 2 कॉलम्समध्ये विभागलेले आहे.
02:08 डाव्या बाजूला एक विस्तृत, मुख्य Content column आहे.
02:13 उजव्या बाजूला एक Blocks column आहे.
02:17 Blocks या columns मधील आयटम आहेत, जे विशिष्ट हेतू किंवा माहिती पुरवतात.
02:25 Blocks Moodle च्या सर्व पेजेसवर आढळतात.

तुम्ही त्यांच्या कोर्सच्या महत्त्वपूर्ण भागांकरिता शॉर्टकट म्हणून विचार करू शकता.

02:35 उदाहरणार्थ Private Files, Online Users, Cou rse Overview इत्यादी माझ्या dashboard वर blocks आहेत.
02:46 लक्षात घ्या की येथे कोणतीही क्रियाकलाप किंवा कोर्सेस नाहीत.
02:50 याचे कारण असे की आम्ही अद्याप कोणताही कोर्स तयार केलेला नाही.
02:56 सर्व कोर्सेस ची यादी पाहिली जाईल - जर यूजर(म्हणजे शिक्षक किंवा विद्यार्थी किंवा ऍडमिन(प्रशासक)) कोर्सेसमध्ये नाव नोंदवेल किंवा नियुक्त असेल.
03:08 हे देखील लक्षात घ्या की Online Users block Admin User दर्शवितो, जे आपले वर्तमान लॉगइन आहे.
03:17 हा block सर्व लॉग इन यूजर्सना कोणत्याही दिलेल्या वेळी दर्शवितो.
03:23 Moodle मधील प्रत्येक block कडे एक विशिष्ट हेतू असतो. आपण blocks ना Moodle मध्ये कोणत्याही column मध्ये कोणत्याही पेज मध्ये जोडू शकतो.
03:34 आता पेजच्या header कडे पाहू.
03:38 वर डाव्या कोपऱ्यात, आपण Navigation Drawer किंवा Navigation menu पाहू शकता. हे आपल्याला Calendar आणि इतर Administration लिंकम ध्ये ऍक्सेस करण्यास मदत करते. हा toggle menu आहे.
03:55 याचा अर्थ जेव्हा क्लिक केले तेव्हा ते आपले status open ते close आणि close ते open मध्ये बदलते.
04:04 आपल्याकडे logo साठी placeholder (जागा) आहे.
04:08 डिफॉल्टनुसार हा short site name आहे. यावर क्लिक केल्याने, आपण कोणत्याही पेजमधून dashboard वर येऊ.
04:18 वर उजवीकडे, notifications आणि messages साठी त्वरित ऍक्सेस आयकॉन्स आहेत.
04:26 त्यानंतर user menu ड्रॉप-डाउन आहे. याला quick access user menu देखील म्हटले जाते.
04:35 या ट्युटोरियलमध्ये थोडक्यात आपण Profile आणि Preferences page वर चर्चा करू.
04:41 हे सर्व menu items देखील toggle menus आहेत, तसेच डाव्या बाजूला स्थित आहे.
04:48 पुढे, Profile लिंकवर क्लिक करा.
04:52 Moodle मधील प्रत्येक यूजरसाठी profile page आहे.
04:57 त्यांच्याकडे users नी त्यांची प्रोफाइल माहिती एडिट करण्यास, त्यांचे forum किंवा blog posts पहाण्याची परवानगी देण्यासाठी लिंक्स आहेत.
05:07 त्यांच्याकडे ऍक्सेस असल्याचे कोणतेही reports तपासा आणि त्यांचे access logs आणि IP address जे शेवटच्या वेळी लॉग इन करण्यास वापरण्यात आले होते.
05:18 आता Edit Profile लिंकवर क्लिक करूया. Edit Profile page उघडेल.
05:26 हे पेज 5 विभागांमध्ये विभागलेले आहे:

General

User Picture

Additional Names

Interests

Optional

05:39 डिफॉल्ट रूपात General section विस्तृत केला जातो.
05:43 कोणत्याही section नावावर क्लिक केल्याने ते विस्तृत किंवा कोसळते.(collapses).
05:49 उजवीकडील ‘Expand all’ लिंक, सर्व sections विस्तृत करते.
05:55 येथे सर्व फील्ड एडिट करू शकतो.
05:59 City / Town जोडू. मी Mumbai टाईप करेन.
06:04 Select a country ड्रॉपडाउन मध्ये India निवडलेले आहे आणि timezone मध्ये Asia/Kolkata सेट केले आहे याची खात्री करा.
06:13 या प्रोफाइल पेजमधून केवळ Admins, password बदलू शकतात.
06:18 मी Optional विभागात काही फील्ड जोडते.
06:22 मी Institution फील्डमध्ये IIT Bombay प्रविष्ट करेल. तसेच Department मध्ये Mathematics आणि Phone number फील्डमध्ये वैध फोन नंबर.
06:36 नंतर पेज सेव्ह करण्यासाठी Update Profile बटणवर क्लिक करा.
06:42 आता वरच्या उजव्या बाजूला quick access user menu वर क्लिक करा.

Preferences लिंकवर क्लिक करा.

06:51 प्रेफरेन्सेस पेज यूजर्सना विविध सेटिंग्स एडिट करण्यासाठी त्वरित ऍक्सेस देते.
06:59 Preferences पेज admin account साठी 4 sections मध्ये विभागलेले आहे:

User account, Roles, Blogs, आणि Badges

07:12 User Account section यूजरला Edit Profile आणि Change Password ची परवानगी देते.
07:19 हे Language, Forum, Calendar, Message, Notification, इत्यादीसाठी preferences देखील सेट करते.
07:30 Calendar preferences वर क्लिक करा.
07:34 आपण 24 तासांच्या स्वरूपात वेळ प्रदर्शित करण्यासाठी calendar सेट करू.
07:40 तसेच, आपण 2 आठवड्यांपर्यंत Upcoming events look-ahead सेट करू.
07:46 याचा अर्थ आपण कॅलेंडरवरील पुढील 2 आठवड्यांमध्ये होणार्या सर्व कार्यक्रमां साठी अधिसूचना पाहू.
07:55 मी सर्व फील्डच्या पुढील help आयकॉन हायलाइट करू इच्छिते.
08:00 यावर क्लिक केल्याने, एक help box उघडेल, ज्यात field म्हणजे काय याचे थोडक्यात तपशील असेल.
08:08 कोणत्याही field बद्दल संशयास्पद असताना, नेहमीच त्याचा अर्थ समजून घेण्यासाठी help आयकॉनवर क्लिक करा.
08:16 इतर सर्व पर्याय त्याप्रमाणे राहू द्या. Save Changes बटणवर क्लिक करा.
08:23 जेव्हा आपण या सिरीज मध्ये त्या वैशिष्ट्यांवर चर्चा करू तेव्हा उर्वरित प्रेफरेन्सेस जाणून घेऊ.
08:30 येथे माहिती लक्षात घ्या.
08:33 हे breadcrumb navigation आहे. हे एक व्हिज्युअल मदत आहे जे आपण Moodle sites’ च्या पदानुक्रमाच्या आत कोणत्या पेजवर आहोत हे सूचित करते.
08:45 हे आपल्याला एका क्लिक सह उच्च-स्तरीय पेजवर परत जाण्यात मदत करते.
08:51 dashboard वर जाण्यासाठी breadcrumbs मधील Dashboard लिंकवर क्लिक करा.
08:57 या सह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
09:03 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो:

admin’s dashboard वर विविध blocks

Admin’s profile page आणि

preferences कशी एडिट करावी.

09:16 येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे.

Message Preferences वर क्लिक करा. Users Moodle मध्ये एकमेकांना खाजगी मेसेज पाठवू शकतात.

09:27 जेव्हा मी ऑफलाईन असेल तेव्ह माझे मेसेजेस ईमेल म्हणून वितरीत केले नाही पाहिजे.
09:33 ऑनलाइन आणि ऑफलाइन हेल्प बॉक्सकडे पहा आणि सेटिंग्ज योग्य असल्याची खात्री करा.
09:40 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाउनलोड करून पहा.

09:48 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

09:57 कृपया या फोरममध्ये तुमचे कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
10:01 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India. यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
10:15 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते.
10:24 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana