Linux/C2/Simple-filters/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:19, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Simple Filters

Author: Manali Ranade

Keywords: Linux


Visual Clue
Narration
0:00 लिनक्सच्या Simple Filters वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
0:08 येथे आपण head, tail, sort, cut आणि paste या बद्दल शिकणार आहोत.
0:17 ही सर्व कमांड लाईन मधून टेक्स्ट मॅन्युप्युलेशन करणारी टूल्स आहेत.
0:22 जर तुम्हाला टर्मिनलवर hash (#) चे चिन्ह दिसत असेल तर या कमांड कार्यान्वित करण्यासाठी तुम्हाला root बनणे आवश्यक आहे. sudo su किंवा su root.
0:29 जर तुम्हाला टर्मिनलवर dollar ($) हे चिन्ह दिसत असेल तर तुम्ही सामान्य user म्हणून कमांडस देऊ शकता.
0:38 आपण असे मानू या की तुम्ही लिनक्सचे डिफॉल्ट इन्स्टॉलेशन केलेले असून फाईल्स जिथे सेव्ह होतात त्या पाथमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
0:46 या ट्युटोरियलसाठी आपण Ubuntu Linux10.10 चा उपयोग करणार आहोत.
0:51 या पाठात आपल्याला माऊस आणि कीबोर्ड तसेच विंडोवरील maximize आणि minimize ही बटणे वापरता येणे अपेक्षित आहे.
1:02 एखाद्या फाईलच्या पहिल्या १० ओळी default रूपात दाखविण्यासाठी headया कमांडपुढे ascii code मधील फाईलचे नाव दिले जाते.
1:10 आपण एक फाईल बनवू या. प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी ESC (एस्केप) चे बटण दाबत आहे.
1:17 मेनूतून माऊसच्या सहाय्याने Application-->Accessories-->Text editor वर जा.
1:24 वेळेच्या बचतीसाठी हे अंक मी आधीपासूनच एका फाईलमध्ये लिहिले आहेत.
1:30 आपण हे अंक कॉपी करून नवीन फाईलमध्ये पेस्ट करून घेऊ.
1:38 आता File वर जाऊन Saveवर क्लिक करा.
1:41 फाईलला numbers.txt असे नाव देऊन सेव्हवर क्लिक करा.
1:48 फाईल बंद करा.
1:53 आता मेनूतून Application-->Accessories-->Terminal वर जा.
2:01 आपण तयार केलेली फाईल आपल्याला बघता येते का ते पाहू.
2:05 lsटाईप करून एंटर दाबा.
2:09 त्यामुळे आपल्याला आपल्या home directory वरील सर्व फोल्डर आणि फाईलची यादी दिसेल.
2:15 आता आपण तयार केलेल्या फाईल मधला मजकूर cat या कमांडच्या सहाय्याने वाचू या.
2:21 फाईलचे नाव आपोआप लिहिले जाण्यासाठी cat आणि num असे टाईप करून टॅबचे बटण दाबा. मग एंटर दाबा.
2:29 असेच head कमांडसाठी देखील करा.
2:33 head numbers.txt असे टाईप करून एंटर दाबा.
2:39 आता आपल्याला पहिल्या 10 ओळी दिसत आहेत.
2:43 जर आपल्याला पहिल्या 5 ओळी बघायच्या असतील तर head कमांड आणि फाईलचे नाव यामध्ये hyphen n5 या पर्यायाचा उपयोग करा.
2:52 up ऍरोचे बटण दाबा. hyphen n5 असे टाईप करून एंटर दाबा.
2:58 आता आपल्याला केवळ 5 ओळी दिसत आहेत.
3:02 पुन्हा प्रेझेंटेशनवर जाऊ या.
3:08 f5 की दाबा.
3:14 tail कमांड head कमांडच्या अगदी उलट काम करते. Default रूपात ही कमांड आपल्याला शेवटच्या 10 ओळी दाखवते.
3:22 आपण alt आणि tab ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनलवर जाऊ.
3:27 tail numbers dot txt असे टाईप करा.
3:31 जर आपल्याला फक्त शेवटच्या 5 ओळी बघायच्या असतील तर tail कमांड आणि फाईलचे नाव यामध्ये hyphen n5 या पर्यायाचा उपयोग करा.
3:40 hyphen n5 टाईप करून एंटर दाबा.
3:45 पुन्हा स्लाईडवर जा.
3:50 log file मध्ये सिस्टीममध्ये झालेल्या प्रत्येक घडामोडींचा समावेश होतो.
3:55 Auth.log या फाईलमध्ये log in आणि log out करणा-यांचा log ठेवला जातो.
4:01 लॉग फाईलचा शेवटचा भाग बघण्यासाठी tail कमांडच्या hyphen f या पर्यायाचा सर्वात जास्त उपयोग होतो.
4:09 लॉग फाईलमध्ये नवीन ओळ जोडली गेल्यास tail कमांड ती ओळ शेवटची ओळ आहे असे समजते आणि default रूपात त्या ओळीच्या वरील १० ओळी दर्शवते.
4:18 आता Terminal वर जा.
4:21 tail space hyphen f space forward slash var log auth dot log असे टाईप करा.
4:31 आता टर्मिनलचा आकार बदलू या.
4:39 अजून एक टर्मिनल उघडू या. Application --> accessories --> terminal
4:46 या टर्मिनलचा आकार बदलू या.
4:52 अशाप्रकारे एकाच स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसेल की टेल कमांड log file ची शेवटची ओळ दाखवते.
5:00 आता su असे टाईप करून एंटर दाबा.
5:05 कुठलाही चुकीचा पासवर्ड देऊन एंटर दाबा.
5:08 आपल्याला दिसेल की ज्या टर्मिनलवर tail कमांड कार्यान्वित आहे तेथील log मध्ये नवीन ओळ आली आहे.
5:15 तारीख आणि वेळ यांच्या सहितAuthentication failure असे दाखविले जाईल.
5:23 सिस्टीमची तारीख आणि वेळ खात्री करण्यासाठी date टाईप करून एंटर दाबा.
5:32 टर्मिनल बंद करण्यासाठी exit टाईप करा.
5:36 कार्यान्वित असलेली tail कमांड बंद करण्यासाठी Ctrl आणि C ही बटणे दाबा आणि terminal maximize करा.
5:51 आपण आधीच्या उदाहरणात केवळ auth dot log फाईल पाहिली आहे.
5:57 सामान्यतः लिनक्समध्ये या लॉग फाईल्स वापरल्या जातात.
6:01 मशीनमध्ये काही समस्या आल्यास trouble shoot करताना Linux System Administrator अधिक माहितीसाठी log फाईलचा उपयोग करू शकतो.
6:12 sort command नावाप्रमाणेच आपली फाईल चढत्या किंवा उतरत्या क्रमाने सॉर्ट करते.
6:23 आपली numbers dot txt ही फाईल चढत्या क्रमाने सॉर्ट करू या.
6:31 लक्षात घ्या इथे काही वेगळेच दिसत आहे. सॉर्ट करताना केवळ पहिलीच अक्षरे बघितली जातात. त्यामुळे आपल्याला 2 या अंकाच्या आधी 10, 11, 12 हे अंक दिसत आहेत.
6:43 हे टाळण्यासाठी hyphen n म्हणजेच नंबर या पर्यायाचा समावेश करा. hyphen n टाईप करून एंटर दाबा.
6:53 संपूर्ण संख्या बघून त्या सॉर्ट केले गेल्या आहेत.
6:58 numbers dot txt ही फाईल उतरत्या क्रमाने सॉर्ट करण्यासाठी hyphen r म्हणजेच रिव्हर्स या पर्यायाचा समावेश करा.
7:09 आपल्या फाईलमध्ये काही अंक पुन्हा पुन्हा आले आहेत. असे अंक काढून टाकून ते एकदाच दिसण्यासाठी hyphen u म्हणजेच युनिक हा अजून एक पर्याय समाविष्ट करा.
7:17 Terminal वर जा.
7:20 Up arrow चे बटण दाबा.
7:22 hyphen u टाईप करून एंटर दाबा.
7:26 पूर्वी 2 हा अंक 2वेळा दिसत होता जो आता केवळ एकदाच दिसत आहे.
7:38 आता आपण एखाद्या विशिष्ट कॉलमवर आधारित फाईल कशी सॉर्ट करतात ते पाहू.
7:44 एक नवीन फाईल बनवून त्यात खालीलप्रमाणे टाईप करू.
7:48 मेनूतून Application -->accessories --> text editor वर जा.
7:57 वेळ वाचवण्यासाठी आधी एका फाईलमध्ये डेटा एंटर केलेला आहे. तिथून कॉपी करून नवीन फाईल मध्ये पेस्ट करू या.
8:11 नवीन फाईल marks dot text हे नाव देऊन Saveवर क्लिक करा.
8:21 विद्यार्थ्यांच्या नावांच्या स्पेलिंग मध्ये असलेल्या स्पेशल कॅरॅक्टर्सकडे दुर्लक्ष करा. ती केवळ गंमत म्हणून टाईप केली आहेत.
8:28 ही फाईल बंद करा.
8:33 आता आपण marks dot text फाईलमधील दुसरा कॉलम सॉर्ट करू या.
8:40 Terminal वर जा.
8:42 sort space marks dot txt space hyphen t space open inverted commas space close inverted commas space असे टाईप करा.
8:53 इथे hyphen t या पर्यायाद्वारे delimiter म्हणून मोकळी जागा वापरत आहोत हे आपण अवतरण चिन्हात space ठेवून सांगितले आहे.
9:02 hyphen k2 आपल्याला दुसरा कॉलम दर्शवते. ज्यावर आपण सॉर्ट करणार आहोत.
9:14 आता एंटर दाबा.
9:20 cat marks dot text असे टाईप करा.
9:24 ही मूळ फाईल आहे. जेव्हा आपण दुस-या कॉलमवर सॉर्ट केल्यामुळे Avir हा शब्द वर आला आणि Bala हा शब्द खाली गेला आहे.
9:43 cut कमांडचा उपयोग फाईल मधील काही माहिती काढून टाकण्यासाठी केला जातो.
9:51 marks dot txt फाईलमधून काही नावे काढू या.
9:55 Alt व Tab ही बटणे दाबून Terminal वर जा.
9:58 cut space marks dot txt space hyphen d space open inverted commas space close inverted commas space टाईप करा.
10:08 येथे cut कमांडमध्ये hyphen d या पर्यायाद्वारे delimiter म्हणून मोकळी जागा वापरत आहोत हे आपण अवतरण चिन्हात space ठेवून सांगितले आहे.
10:20 hyphen f2 हे दुस-या कॉलमसाठी आहे. एंटर दाबा.
10:31 paste कमांड, संबंधित फाईल मधल्या पाठोपाठच्या ओळी एकमेकांना जोडेल.
10:36 आपण number dot txt आणि marks dot txt या दोन्ही फाईलचा उपयोग करू या.
10:41 Terminal वर जा.
10:43 paste number dot txt marks dot txt असे टाईप करून एंटर दाबा.
10:50 आता marks dot txt ची पहिली ओळ number dot txt च्या पहिल्या ओळीला जोडली गेली आहे.
10:57 आपण redirect key च्या सहाय्याने येणारे आऊटपुट concatefile.txt नामक दुस-या फाईलमध्ये नेऊ शकतो.
11:06 त्यासाठी पुन्हा Terminal वर जा.
11:08 up arrow बटण दाबा. redirect key म्हणजेच greater than (>) हे चिन्ह असलेले बटण दाबा आणि concatefile dot txt असे टाईप करून एंटर दाबा.
11:18 cat concatefile dot txt असे टाईप करा.
11:22 पुन्हा स्लाईडवर जा.
11:25 paste hyphen sया पर्यायाचा वापर करून आपण Tab ने delimitकेलेल्या संख्या क्रमानुसार प्रिंट करू शकतो.
11:34 paste hyphen s
11:39 numbers dot txt असे टाईप करा.
11:43 पुन्हा स्लाईडवर जा.
11:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
11:49 यासाठी National Mission on Education through ICT यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
11:55 *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे.
11:59 *ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha