Difference between revisions of "Linux-Old/C2/Ubuntu-Software-Center/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
m (moved Linux-Ubuntu/C2/Ubuntu-Software-Center/Marathi to Linux/C2/Ubuntu-Software-Center/Marathi: Combining Linux & Linux-Ubuntu FOSS Categories.)
(No difference)

Revision as of 02:11, 21 April 2013

Title of script: Installation Through Ubuntu software center

Author: Manali Ranade

Keywords: Ubuntu


Visual Clue
Narration
0:00 Ubuntu Software Center वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
0:04 यात आपण शिकू Ubuntu Software Center चा वापर.
0:09 Ubuntu Operating System वर सॉफ्टवेअरdownload, install, update आणि uninstall करणे .
0:16 Ubuntu Software Center म्हणजे काय?
0:18 हे Ubuntu वरील सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करणारे टूल आहे.
0:23 याचा वापर सॉफ्टवेअर शोधणे, download, install, update आणि uninstall करण्यासाठी होतो.
0:30 तसेच Ubuntu Software Center, प्रत्येक सॉफ्टवेअरचे reviews आणि ratings ची सूची दाखवतो.
0:36 अशा प्रकारे सॉफ्टवेअरबद्दलची माहिती ते वापरण्यापूर्वी आपल्याकडे असते.
0:41 ते सॉफ्टवेअरच्या पूर्व इतिहासाची नोंदही ठेवते.
0:45 या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu 11.10 versionवरील Ubuntu Software Center वापरणार आहोत.
0:52 आता पुढे जाऊ या.
0:54 तुमचे इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे.
0:56 सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला Administrator rights असणे आवश्यक आहे.
1:04 तुमच्या Launcher वरील Ubuntu Software Center आयकॉनवर क्लिक करा.
1:08 Ubuntu Software Centerची विंडो उघडेल.
1:12 विंडोच्या वरती डावीकडे All Software, Installed आणि History ही बटणे दिसतील.
1:19 वरती उजवीकडे कोप-यात Search field दिसेल.
1:23 Ubuntu Software Center दोन पॅनेल्समध्ये विभागलेले असते.
1:28 डावीकडील पॅनेल सॉफ्टवेअर categories ची सूची दाखवते.
1:33 उजवीकडील पॅनेल What's New आणि Top Rated ची सूची दाखवेल.
1:38 What's New panel नव्याने उपलब्ध झालेल्या सॉफ्टवेअरची सूची दाखवते.
1:42 Top Rated panel मध्ये सर्वाधिक user rating असलेली आणि वारंवार डाऊनलोड झालेल्या सॉफ्टवेअरची यादी दिसेल.
1:51 category प्रमाणे सॉफ्टवेअर ब्राऊज करू या.
1:55 डाव्या पॅनेलमधील Internet वर क्लिक करा.
1:58 Internet या category साठी Internet software आणि top rated software अशी यादी दाखवली जाईल.
2:05 काही सॉफ्टवेअरच्या नावाशेजारी tick mark केलेले वर्तुळ दिसेल.
2:10 याचा अर्थ ते सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर आधीच इन्स्टॉल केलेले आहे.
2:15 All च्या आयकॉनवर क्लिक करून Internet category मधील अधिक सॉफ्टवेअर बघू शकतो.
2:21 Internet या category तील उपलब्ध सॉफ्टवेअर विंडोमध्ये दिसतील.
2:26 तसेच आपण सॉफ्टवेअर Name, Top Rated किंवा Newest First प्रमाणे सॉर्ट करू शकतो.
2:32 वरती उजवीकडील कोप-यात असलेल्या drop-down वर क्लिक करा.
2:36 सूची मधील By Top Rated हा पर्याय निवडा.
2:40 Internet सॉफ्टवेअरची मांडणी त्यांच्या ratings नुसार झाली आहे.
2:45 तुमच्या संगणकावर इन्स्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरची संपूर्ण यादी बघण्यासाठी,
2:50 Installed या बटणावर क्लिक करा.
2:53 सॉफ्टवेअरची category दाखवली जाईल.
2:56 Sound आणि Video च्या अलीकडे असलेल्या छोट्या त्रिकोणी बटणावर क्लिक करा.
3:02 संगणकावरील Sound आणि Videoशी संबंधित सॉफ्टवेअरची यादी दिसेल.
3:08 All Softwareवर क्लिक करा आणि drop-down मधील Provided by Ubuntu हा पर्याय निवडा.
3:14 Ubuntuद्वारा प्रदान केलेल्या सर्व सॉफ्टवेअरची यादी दिसेल.
3:19 आता VLC media player हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू या.
3:24 विंडोवरती उजव्या बाजूला Search box मध्ये VLC टाईप करा.
3:29 VLC media player दिसेल.
3:33 इन्स्टॉलवर क्लिक करा.
3:35 Authentication नामक dialog box उघडेल.
3:38 तुमचा system password टाईप करा.
3:42 Authenticate वर क्लिक करा.
3:44 progress bar कडे बघा. आपल्याला VLCइन्स्टॉल होत असल्याचे दिसत आहे.
3:50 पॅकेजच्या आकारमानानुसार ते इन्स्टॉल होण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त असू शकतो.
3:57 वरती progress दाखवणारे बटण ही उपलब्ध आहे.
4:02 Installation ची क्रिया होत असताना आपण इतर applications ही निवडू शकतो.
4:07 एकदा VLCइन्स्टॉल झाले की त्याच्या समोर एक छोटा tick mark दिसेल.
4:13 उजवीकडे Remove बटण दिसत आहे.
4:17 जर आपल्याला VLC uninstall करायचे असेल तर केवळ Removeया बटणावर क्लिक करा.
4:23 अशाच प्रकारे आपण इतर सर्व सॉफ्टवेअर पॅकेजेस शोधून इन्स्टॉल करू शकतो.
4:29 आता आपणHistory बघू या.
4:31 येथे आपल्याला आपण केलेले सर्व बदल बघता येतात. जसे की installations,
4:37 updates आणि काढून टाकलेली सॉफ्टवेअर्स.
4:40 History वर क्लिक करा. Historyचा डायलॉग बॉक्स उघडेल.
4:45 All Changes, Installations, Updates आणि Removals आपण History मध्ये बघू शकतो.
4:51 All Changes वर क्लिक करा.
4:53 आपण केलेले सर्व बदल दिसतील म्हणजेच Installations, Updates आणि Removals.
5:01 तुम्ही इन्स्टॉल केलेली सॉफ्टवेअर नियमितपणे Update करू शकता.
5:07 Ubuntu च्या वेबसाईटवर तुम्हाला Ubuntu आणि Ubuntu Software Center बद्दलची अधिक माहिती मिळेल.
5:17 अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
5:21 यात आपण शिकलो Ubuntu Software Center चा वापर.
5:26 तसेच आपण Ubuntu Operating System वर सॉफ्टवेअर download, install, update आणि un-install करण्याबद्दल शिकलो.
5:36 आता assignment करू या.
5:39 Ubuntu सॉफ्टवेअरच्या मदतीने Thunderbird हे सॉफ्टवेअरDownload आणि install करू.
5:46 *प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
5:49 *ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
5:52 *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
5:57 *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
5:59 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
6:02 *परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
6:06 *अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जा./अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
6:12 *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
6:17 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
6:24 *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
6:28 spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro
6:35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Pravin1389, Ranjana, Sneha