Linux-AWK/C2/Basics-of-Single-Dimensional-Array-in-awk/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:47, 26 March 2019 by Ranjana (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 awk मध्ये Basics of single dimensional array वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - awk मध्ये Arrays
00:12 array elements असाईन करणे
00:15 इतर प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमधील arrays पेक्षा हे वेगळे कसे आहेत आणि array चे elements संदर्भित करणे.
00:23 आपण हे काही उदाहरणांद्वारे करू.
00:26 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी Ubuntu Linux 16.04 Operating System आणि gedit text editor 3.20.1 वापरत आहे.
00:38 आपण आपल्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:42 ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी, आपण आपल्या वेबसाईटवरील मागील awk ट्युटोरिअल्स पहा.
00:49 आपण C किंवा C++ सारख्या कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजशी परिचित असावे.
00:56 नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा.
01:02 ह्या ट्युटोरिअलमध्ये वापरल्या गेलेल्या फाईल्स, ह्या ट्युटोरिअल पेजवरील Code Files मध्ये उपलब्ध आहेत. कृपया डाऊनलोड करा आणि एक्सट्रॅक्ट करा.
01:11 awk मध्ये array काय आहे?

awk संबंधित एलिमेंट्स संग्रहित करण्यासाठी array सहाय्य करते.

01:18 एलिमेंट्स हे number किंवा string असू शकतात.
01:21 awk मध्ये Arrays सहयोगी आहेत.
01:24 ह्याचा अर्थ असा की प्रत्येक अॅरे एलिमेंट हा एक index-value pair आहे.
01:29 इतर कोणत्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये ते अगदी arrays सारखे दिसतात.
01:33 पण तिथे काही महत्वाचे फरक आहेत.
01:36 प्रथम, ते वापरण्यापूर्वी array घोषित करणे गरजेचे नाही.
01:41 तसेच array मध्ये किती एलिमेंट्स असतील ते निर्दिष्ट करण्याची आवश्यकता नाही.
01:47 प्रोग्रामिंग लँग्वेजेमध्ये, array index हा एक सामान्यतः पॉझिटिव्ह पूर्णांक असतो.
01:52 सहसा index 0 पासून सुरू होतो, नंतर 1, नंतर 2 आणि पुढे.
01:58 पण awk मध्ये, index काहीही असू शकतो - कोणत्याही नंबर किंवा स्ट्रिंग.
02:03 awk मध्ये array element असाईन करणे हे सिंटॅक्स आहे.

Array name कोणतेही वैध व्हेरिएबल नाव असू शकते.

02:11 येथे index हे इंटिजर किंवा स्ट्रिंग असू शकतो.
02:16 Strings डबल कोट्समध्ये लिहिले पाहिजे, मग ते इंडेक्स नेम असो किंवा व्हॅल्यू.
02:23 हे उदाहरणासह समजून घेऊ.
02:27 मी आधीच कोड लिहिला आहे आणि त्यास array_intro.awk म्हणून सेव्ह केले आहे.
02:34 ही फाईल, प्लेअरच्या खालील Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहे.

कृपया डाऊनलोड करा आणि वापरा.

02:41 येथे मी आठवड्याचे दिवस उदाहरण म्हणून घेतले आहेत आणि ते BEGIN section च्या आत लिहिले आहे.
02:48 येथे, अॅरेचे नाव day आहे.
02:52 मी इंडेक्स 1 आणि व्हॅल्यू Sunday म्हणून सेट केले आहे.
02:57 ह्या अॅरे एलिमेंटमध्ये मी स्ट्रिंग इंडेक्स म्हणून वापरली आहे.

तर index first साठी व्हॅल्यू Sunday आहे.

03:06 संपूर्ण अॅरे तशाचप्रकारे तयार केले आहे.
03:10 येथे लक्ष द्या, अॅरे एलिमेंट अनुक्रमेत नाहीत.

मी day three आधी day four घोषित (डिक्लेअर) केले आहे.

03:18 awk मध्ये अॅरे, इंडेक्स अनुक्रमिक पद्धतीने असणे आवश्यक नाही.
03:23 associative array चे फायदे म्हणजे नवीन जोड्या (पेअर्स) कोणत्याही वेळी जोडल्या जाऊ शकतात.
03:29 मी अॅरेमध्ये day 6 जोडते.
03:33 कर्सर शेवटच्या ओळीच्या शेवटी ठेवा आणि एंटर दाबा.

नंतर खाली टाईप करा.

03:42 फाईल सेव्ह करा.
03:44 आपण अॅरे घोषित (डिक्लेअर) केले आहे.

परंतु आपण array element चा संदर्भ कसा दिला पाहिजे?

03:49 एका विशिष्ट इंडेक्सवर एलिमेटचा संदर्भ घेण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट्समध्ये arrayname आणि index लिहा. आता हे करून पाहू.
03:58 पुन्हा एकदा कोडवर जा.
04:01 कर्सर क्लोजिंग कर्ली ब्रेसच्या समोर ठेवा.
04:05 एंटर दाबा आणि टाईप करा print space day स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 6
04:13 कोड सेव्ह करा.
04:15 Ctrl, Alt आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा.
04:20 आपण cd command वापरून Code Files डाऊनलोड आणि एक्सट्रॅक्ट केलेल्या फोल्डरवर जा.
04:27 टाईप करा awk space hyphen small f space array_intro.awk

एंटर दाबा.

04:38 पहा, आपल्याला आऊटपुट म्हणून Friday मिळेल.
04:42 पुढे आपण, एका विशिष्ट इंडेक्सच्या ठिकाणी अॅरेमध्ये एखादा element अस्तित्वात आहे की नाही हे तपासणार आहोत.
04:48 ह्यासाठी आपल्याला in operator वापरणे आवश्यक आहे. मी हे उदाहरणासह स्पष्ट करते.
04:55 एडिटर विंडोमधील कोडवर जा.
04:59 print statement च्या शेवटी कर्सर ठेवा आणि एंटर दाबा.

नंतर दर्शविल्याप्रमाणे टाईप करा.

05:09 कोड सेव्ह करा.
05:11 आता मी दोन if conditions जोडल्या आहेत.
05:15 पहिली if condition ही day मध्ये index two उपस्थित आहे की नाही हे तपासते.
05:21 जर होय, तर संबंधित print statement कार्यान्वित होईल.
05:26 मग दुसरी condition ही day मध्ये index seven उपस्थित आहे की नाही हे तपासते.

जर ते true (ट्रू) असेल तर print statement कार्यान्वित होईल.

05:35 जसे आपण पाहू शकतो, अॅरेमध्ये index two आहे आणि seven नाही.

आऊटपुट सत्यापित करण्यासाठी ही फाईल कार्यान्वित करू.

05:44 terminal वर जा. पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड परत मिळविण्यासाठी अप अॅरो की दाबा.
05:51 कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा.
05:54 आपल्याला अपेक्षित आऊटपुट मिळते.
05:57 आपण आता कोडमध्ये काही अधिक बदल करू.

येथे दर्शविल्याप्रमाणे कोड अपडेट करा.

06:04 day condition मध्ये, 7 खाली मी आणखी एक condition जोडली आहे.
06:09 हे index seven ची व्हॅल्यू शून्य आहे की नाही हे तपासेल.
06:14 जर true असेल, तर ते प्रिंट करेल Index 7 is not null
06:18 आपल्याला आधीच माहित आहे की आपल्याकडे 7 सह कोणताही index नाही, त्यामुळे तो काहीही प्रिंट करणार नाही.
06:24 पुढे, day मध्ये condition 7 ची print statement आपण बदलली आहे.
06:30 कोड सेव्ह करा.

आपण कोड कार्यान्वित करतो तेव्हा काय होते ते पाहू.

06:35 terminal वर जा.
पूर्वी कार्यान्वित केलेले कमांड मिळविण्यासाठी अप अॅरो की दाबा.
06:43 कार्यान्वित करण्यासाठी एंटर दाबा.
06:46 आपल्याला अनपेक्षित आऊटपुट मिळाला.
06:49 स्टेटमेंट '"Index 7 is present after null comparison प्रिंट केले आहे.

हे कसे शक्य आहे?

06:57 जेव्हा आपण लिहितो, day[7] not equal to null

तेव्हा आपण index 7 वर element एक्सेस करण्याचा प्रयत्न करीत आहोत.

07:04 ही ऍक्सेस स्वतः प्रथम index 7 वर एक एलिमेंट तयार करेल आणि null व्हॅल्यूसह ते आरंभ करेल.
07:12 पुढे, index 7 वर कोणताही एलिमेंट खरोखर अस्तित्वात आहे की नाही हे तपासण्याचा प्रयत्न करीत आहोत.
07:18 जरी null element आधीच तयार झाला आहे, आऊटपुट दर्शवितो की Index 7 हा null कम्पॅरिजननंतर उपस्थित आहे.
07:26 तर हे लक्षात ठेवा.

day at index 7 not equal to null हा एलिमेंटची उपस्थिती तपासण्याचा एक चुकीचा मार्ग आहे.

07:34 हे index 7 वर null element तयार करेल.
07:38 त्याऐवजी आपल्याला in operator वापरावे लागेल.
07:41 हे अॅरेमधील कोणतेही अतिरिक्त एलिमेंट तयार करणार नाही.

आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

07:50 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो - awk मध्ये Arrays
07:54 array elements असाईन करणे
07:56 इतर प्रोग्रामिंग लॅंग्वेजेसमध्ये हे arrays पेक्षा वेगळे कसे आहेत
08:00 array चे elements संदर्भित करणे.
08:03 असाईनमेंट म्हणून- array flowerColor परिभाषित करा.
08:07 इंडेक्समध्ये फुलांची नावे असतील.
08:10 फुलांच्या संबंधित रंगांचे व्हॅल्यू असतील.
08:14 आपल्या आवडीच्या कोणत्याही पाच फुलांची इन्ट्री प्रविष्ट करा.
08:18 चौथ्या फुलाचा रंग प्रिंट करा

अॅरेमधे “Lotus” फूल उपस्थित आहे का ते तपासा.

08:25 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते.

कृपया ते डाऊनलोड करून पहा.

08:33 Spoken Tutorial Project टीम स्पोकन ट्युटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

आणि ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

08:42 अधिक माहितीसाठी कृपया आम्हांला लिहा.
08:46 कृपया ह्या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
08:50 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.

09:01 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana