Difference between revisions of "LibreOffice-Suite-Writer-6.3/C2/Inserting-images,-hyperlinks,-bookmarks-in-Writer/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
m
Line 15: Line 15:
 
|-  
 
|-  
 
|| 00:12
 
|| 00:12
|| ''Image file'''
+
|| '''Image file'''
  
 
|-  
 
|-  

Revision as of 18:02, 13 July 2020

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Inserting Images, Hyperlinks & Bookmarks वरील पाठात आपले स्वागत.


00:08 या पाठात आपण शिकणार आहोत:
Writer डॉक्युमेंटमधे 
00:12 Image file
00:14 Hyperlink
00:16 Bookmark समाविष्ट करणे.
00:20 या पाठासाठी मी वापरत आहे-

Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि LibreOffice Suite वर्जन 6.3.5

00:32 प्रथम LibreOffice Writer मधे image file समाविष्ट करण्याची पध्दत जाणून घेऊ.
00:38 आपण पूर्वी बनवलेली resume.odt ही फाईल उघडा.
00:44 ही फाईल आणि इमेज फाईल या पाठाच्या पेजवरील Code files लिंकमधे दिलेल्या आहेत.

या फाईल्स डाऊनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.

00:54 त्या फाईलची कॉपी बनवून सरावासाठी तिचा वापर करा.
00:59 मला येथे उजवीकडे image समाविष्ट करायची आहे.
01:04 आधी सांगितल्याप्रमाणे Code files लिंकमधे ही image दिलेली आहे.
01:10 Mother’s Occupation Housewife या ओळीवर जाऊन दोन वेळा Enter दाबा.
01:17 आता Standard toolbar वरील Insert Image आयकॉनवर क्लिक करा.
01:22 Insert Image हा डायलॉग बॉक्स उघडेल.
01:25 तुम्ही फाईल सेव्ह केली आहे त्या ठिकाणी जा.
01:29 मी file एक्स्ट्रॅक्ट करून Desktop वर सेव्ह केली आहे.
01:33 मी image file वर क्लिक करून ती सिलेक्ट करत आहे.
01:37 नंतर वरील उजव्या कोपऱ्यातील Open बटण क्लिक करा.
01:41 आपल्या डॉक्युमेंटमधे Image समाविष्ट होईल.
01:45 ही इमेज resize करून Resume डॉक्युमेंटच्या उजवीकडील कोपऱ्यात वर नीट बसवू शकतो.
01:51 इमेज सिलेक्ट करा.

image, वर आठ handles दिसतील.

01:57 mouse च्या सहाय्याने कोणत्याही बाजूच्या handles वर क्लिक करा.
02:01 नंतर image चा आकार कमी किंवा जास्त करण्यासाठी ड्रॅग करा.
02:04 हे बदल Undo करण्यासाठी दोन वेळा Ctrl+Z दाबा.
02:08 कोपऱ्यातील handles वापरून दोन्ही परिमाणे एकाच वेळी scale करू शकतो.
02:14 आपण असे करतो तेव्हा त्यांचे प्रमाण राखले जाते.
02:18 माऊस क्लिक आणि ड्रॅग करून अशाप्रकारे image ला Resize करा.
02:23 आकार बदलून झाल्यावर image वर क्लिक करून ती डॉक्युमेंटच्या उजव्या कोपऱ्यात वर ड्रॅग करा.
02:30 मेनूबारमधील Insert मेनूवर क्लिक करून देखील आपल्याला images समाविष्ट करता येतात.
02:36 त्यासाठी नंतर Image या पर्यायावर क्लिक करा.
02:40 नंतर Writer मधे Hyperlink कशी बनवायची हे जाणून घेऊ.
02:44 documents मधील Hyperlink म्हणजे क्लिक करता येणारे शब्द किंवा phrases आहेत.
02:49 हायपरलिंक क्लिक केल्यावर आपण नवीन document किंवा याच document मधील नवीन भागावर जातो.
02:55 या फाईलमधे hyperlink बनवण्यापूर्वी प्रथम hyperlinked करायचे नवे document तयार करू.
03:02 standard toolbar मधील New आयकॉन क्लिक करा.
03:06 Untitled 1 नावाचे नवे Writer डॉक्युमेंट उघडेल.
03:11 आता या नव्या डॉक्युमेंटमधे छंदांची एक यादी बनवू.
03:16 HOBBIES असे heading टाईप करून Enter दाबा.
03:21 आता काही छंद टाईप करूया जसे की,
03:25 Listening to music,
03:27 Playing table tennis आणि Painting असे एकाखाली एक लिहा.
03:32 नंतर ही फाईल Ctrl + S एकत्रितपणे दाबून सेव्ह करा.
03:37 फाईल ब्राऊजरमधे, फाईल सेव्ह करण्यासाठी मी Desktop हा फोल्डर निवडत आहे.
03:43 डायलॉगबॉक्सच्या Name फिल्डमधे HOBBY हे फाईलचे नाव टाईप करा.
03:48 नंतर उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या Save बटणावर क्लिक करा.
03:52 उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या X आयकॉनवर क्लिक करून HOBBY.odt फाईल बंद करा.
03:59 आता Resume.odt मधे hyperlink बनवू जी तुम्हाला या डॉक्युमेंटवर घेऊन जाईल.
04:06 माऊसचा कर्सर document च्या शेवटच्या ओळीच्या शेवटी ठेवून दोन वेळा Enter दाबा.
04:12 HOBBIES हा शब्द टाईप करा.
04:15 आता HOBBIES या शब्दावर कर्सरने ड्रॅग करून तो सिलेक्ट करा.
04:20 नंतर मेनूबारमधील Insert menu वर क्लिक करून Hyperlink या पर्यायावर क्लिक करा.
04:26 Hyperlink चा डायलॉग बॉक्स उघडेल.
04:29 डावीकडे Internet, Mail, Document आणि New Document हे पर्याय दिसतील.
04:37 दुसऱ्या text document ची hyperlink तयार करण्यासाठी Document या पर्यायावर क्लिक करा.
04:43 येथे दोन भाग आहेत

Document आणि Target in Document.

04:50 Target in Document या फीचरबद्दल पाठात पुढे जाणून घेऊ.
04:56 Path फिल्डच्या उजवीकडील folder च्या आयकॉनवर क्लिक करा.
05:00 Desktop लोकेशन निवडा.
05:03 खाली स्क्रॉल करून आपण बनवलेले HOBBY.odt हे नवे डॉक्युमेंट शोधा.
05:09 आता “HOBBY.odt” फाईलवर डबल क्लिक करा.
05:13 Path फिल्डमधे फाईलचा path समाविष्ट झाला आहे.
05:18 खालील भागातील प्रथम Apply बटण आणि नंतर Close बटण क्लिक करा.
05:24 "HOBBIES" हे टेक्स्ट निळ्या रंगात अधोरेखित झाल्याचे दिसेल.
05:30 म्हणजेच आता हे टेक्स्ट एक hyperlink आहे.
05:34 आता HOBBIES या शब्दावर कर्सर ठेवा.
05:38 नंतर Ctrl की आणि mouse चे डावे बटण एकत्रितपणे दाबा.
05:42 HOBBY.odt ही फाईल उघडलेली दिसेल.
05:46 ही फाईल बंद करण्यासाठी उजव्या कोपऱ्यात वर असलेल्या X आयकॉनवर क्लिक करा.
05:51 आता Bookmarks कसे समाविष्ट करायचे हे जाणून घेऊ.
05:55 Bookmark म्हणजे paragraph किंवा मजकूरामधील विशिष्ट स्थान दर्शवणारे टेक्स्ट.
06:02 Bookmarks चा उपयोग मोठी documents वाचत असताना होतो.
06:06 हे डॉक्युमेंटमधील विशिष्ट पाने किंवा paragraphs चिन्हांकित करतात यामुळे पुन्हा तेथे सहजपणे पोचता येते.
06:13 मी RAMESH हे टेक्स्ट सिलेक्ट करत आहे.
06:16 नंतर Standard toolbar मधील Insert Bookmark वर क्लिक करू.
06:21 Bookmark हा डायलॉग बॉक्स उघडेल.
06:24 टेक्स्ट फिल्डमधे Bookmark 1 हे नाव दिसेल.
06:28 आपण येथे स्वतःचे customised नाव देखील देऊ शकतो.
06:32 मी हेच नाव राहू देत आहे.
06:35 या फिल्डच्या उजवीकडे खालील Insert बटणावर क्लिक करा.
06:39 Bookmark चा डायलॉग बॉक्स आपोआप बंद होईल.
06:43 आता डॉक्युमेंटमधील SELF EMPLOYED हे आणखी एक टेक्स्ट सिलेक्ट करू.
06:49 पुन्हा एकदा Standard toolbar वरील Insert Bookmark हा आयकॉन क्लिक करू.
06:55 यावेळी डायलॉग बॉक्समधील सूचीमधे आधी तयार केलेला bookmark दिसेल.
07:01 आता हे फिल्ड Bookmark 2 नाव दाखवेल.

पुन्हा, मी हेच डिफॉल्ट नाव ठेवत आहे.

07:08 फिल्डच्या उजवीकडील Insert बटण क्लिक करा.
07:13 Standard toolbar मधील Insert Bookmark आयकॉनवर क्लिक करा.
07:18 आता डायलॉग बॉक्स आपल्याला दोन bookmarks दाखवेल.
07:22 त्यापैकी एखाद्यावर क्लिक करा. नंतर डायलॉग बॉक्सच्या खालील भागात असलेल्या Go to बटण क्लिक करा.
07:28 Close बटणावर क्लिक करा.
07:31 हे document मधील टेक्स्टच्या निर्दिष्ट भागावर घेऊन जाईल.
07:36 Standard toolbar मधील Insert bookmark आयकॉनवर क्लिक करा.
07:41 आता दुसऱ्या bookmark वर क्लिक करा.

नंतर डायलॉगबॉक्सच्या खालील भागातील Go to बटण क्लिक करा.

07:49 Close बटणावर क्लिक करा.
07:52 हे document मधील टेक्स्टच्या दुसऱ्या निर्दिष्ट भागावर घेऊन जाईल.
07:58 डायलॉग बॉक्समधील इतर बटणांचे कार्य तुम्ही ती स्वतः वापरून जाणून घ्या.
08:03 अशाप्रकारे Writer डॉक्युमेंटमधे Bookmarks समाविष्ट केले जातात आणि वापरले जातात.
08:09 Resume.odt फाईल Ctrl+S दाबून सेव्ह करा.
08:14 नंतर विंडोच्या उजव्या वरील कोपऱ्यातील X आयकॉन क्लिक करून फाईल बंद करा.
08:20 Target in document हे Hyperlinks मधील आणखी एक फीचर आहे.
08:25 हे वाचकांना target document मधील विशिष्ट भाग शोधण्यास मदत करेल.
08:30 HOBBY.odt फाईल उघडा.
08:33 डॉक्युमेंटमधील tennis हा शब्द निवडा.
08:37 मेनूबारमधील Insert मेनूवर क्लिक करा आणि Bookmark पर्याय निवडा.
08:42 Bookmark डायलॉग बॉक्समधे Bookmark1 या ठिकाणी

tennis असे टाईप करा.

08:48 आता उजवीकडील Insert बटण क्लिक करा.
08:52 आता ही फाईल सेव्ह करून बंद करा.
08:56 आता Resume.odt ही फाईल पुन्हा उघडा.
HOBBIES’ हा शब्द सिलेक्ट करा.
09:04 मेनूबारमधील Insert मेनूवर क्लिक करून Hyperlink पर्याय निवडा.
09:09 Hyperlink चा डायलॉग बॉक्स उघडेल.
09:12 डावीकडे Document वर क्लिक करा.
09:15 Path फिल्डमधे, HOBBY.odt फाईलचा संपूर्ण Path दिसेल.
09:21 Target in document या भागात खाली उजवीकडे असलेल्या वर्तुळाकार आयकॉनवर क्लिक करा.
09:27 Target in document हा यादी दर्शवणारा बॉक्स उघडेल.
09:31 बाणावर क्लिक करून Bookmarks हा भाग मोठा करा आणि tennis हा bookmark निवडा.
09:37 Apply बटणावर क्लिक करून नंतर Close वर क्लिक करा.
09:42 Hyperlink च्या डायलॉग बॉक्समधील Target फिल्डमधे tennis हे टेक्स्ट दिसेल.
09:48 तसेच HOBBY.odt फाईलचा पाथ URL फिल्डमधे समाविष्ट झाला आहे.
09:54 खालील Apply वर प्रथम क्लिक करा. नंतर Close वर क्लिक करा.
10:00 HOBBIES या शब्दावर कर्सर ठेवा

आणि Ctrl की आणि माऊसचे डावे बटण एकत्रितपणे दाबा.

10:06 या वेळी कर्सर HOBBY.odt फाईलमधे tennis या शब्दाच्या लगेचच पुढे आहे.
10:12 Target file मोठी आणि अनेक पानांची असते तेव्हा ही सुविधा उपयुक्त ठरते.
10:18 X आयकॉनवर क्लिक करून HOBBY.odt फाईल बंद करा.
10:22 Resume.odt वर परत जा.
10:26 फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl + S दाबा.
10:30 X या आयकॉनवर क्लिक करून फाईल बंद करा.
10:34 आपण ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

10:39 या पाठात आपण Writer डॉक्युमेंटमधे

Image file, Hyperlink, Bookmark समाविष्ट करण्याबद्दल जाणून घेतले.

10:48 असाईनमेंट म्हणून:

practice.odt फाईल उघडा.

10:52 फाईलमधे तुमच्या आवडीची image समाविष्ट करा.
10:56 फाईलमधील image वर क्लिक केल्यावर www.google.com ही वेबसाईट उघडणारी hyperlink बनवा.
11:04 कमीत कमी दोन bookmarks समाविष्ट करा.
11:07 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

11:14 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

11:21 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
11:25 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:30 DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते.


11:37 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali