Difference between revisions of "Koha-Library-Management-System/C3/Convert-Excel-to-MARC/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 288: Line 288:
 
|-  
 
|-  
 
|11:59
 
|11:59
| '''Process has been finished. Records saved to: '''C:\Users\Spoken\Download\TestData.mrk ''' संदेशासह पॉप-अप विंडो उघडते.  
+
| '''Process has been finished. Records saved to: '''C:\Users\Spoken\Download\TestData.mrk''' संदेशासह पॉप-अप विंडो उघडते.  
 
|-  
 
|-  
 
| 12:14
 
| 12:14

Revision as of 12:10, 28 February 2019

Time Narration
00:01 conversion of Excel data to Marc 21 format वरील Spoken Tutorial मध्ये आपले स्वागत आहे.
00:09 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत -64-bit Windows मशीनवर Excel data

Marc 21 format मध्ये रुपांतरित(कनवर्ट) करणे.

00:19 हे ट्युटोरियल रेकॉर्ड करण्यासाठी मी वापरत आहे: Windows 10 Pro आणि Firefox web browser.
00:29 ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी, विद्यार्थ्यांना लायब्ररी सायन्सचे ज्ञान असावे.
00:35 पुढे जाण्यापूर्वी, कृपया आपल्या मशीनवर खालील गोष्टी असल्याची खात्री करा-

Windows 10, 8 किंवा 7,

00:45 कोणतेही वेब ब्राऊजर उदा. - Internet Explorer, Firefox किंवा Google Chrome.
00:53 आधीच्या ह्याच सिरिजमध्ये आपण Desktop वर MarcEdit 7 इन्स्टॉल केले होते.
01:00 आयकॉनवर डबल-क्लिक करून तेच MarcEdit 7 उघडा.
01:07 MarcEdit 7.0.250 By Terry Reese नावाची विंडो उघडते.
01:15 Export Tab Delimited Text टॅबवर जा आणि त्यावर क्लिक करा.
01:21 Source File फिल्ड मध्ये, folder आयकॉन वर जा.
01:27 source file ही Excel file आहे जी आपण .mrk फॉरमॅटमध्ये रूपांतरीत करीत आहोत.
01:34 Folder साठी ह्या आयकॉनवर क्लिक करा आणि File name साठी field मध्ये Excel फाईलसाठी ब्राऊझ करा.
01:42 File name च्या समीप ड्रॉप-डाऊनवर क्लिक करा.
01:46 तुमच्याकडे Microsoft Excel 97/2000/XP/2003 (.xls) असल्यास Excel File(*.xls) निवडा.
02:03 आणि तुमच्याकडे Microsoft Excel 2007/2010/2013 XML(.xlsx) असल्यास, Excel File(*.xlsx) निवडा.
02:21 माझ्याकडे .(dot)xlsx फाईल असल्यामुळे, मी Excel XML File(*.xlsx) निवडेन.
02:32 पुढे, डावीकडील फोल्डर्सवर जा आणि जिथे तुमची Excel file सेव्ह केली आहे तो फोल्डर निवडा
02:40 मी Downloads निवडले आहे कारण तिथे मी माझी Excel file सेव्ह केली आहे.
02:47 तर, Downloads फोल्डरमधून, मी TestData.xlsx. निवडले आहे.
02:55 TestData.xlsx फाईल निवडली आहे तेव्हा ती File name फिल्डमध्ये प्रदर्शित होते.
03:04 आता विंडोच्या तळाशी असलेल्या Open बटणावर क्लिक करा.
03:09 Source File C:\Users\spoken\Downloads\TestData.xlsx म्हणून तिच विंडो पुन्हा उघडते.
03:21 आता, Output File च्या समीप असलेल्या फोल्डरच्या आयकॉनवर क्लिक करा.
03:27 असे केल्यावर, Save File विंडो उघडेल, आपल्याला File name भरण्यास सूचित करते
03:34 त्याच विंडोवर, डाव्या बाजूला स्थित Downloads फोल्डर वर क्लिक करेन.

आणि, File name: म्हणून TestData टाईप करेन.

03:46 आता पृष्ठाच्या तळाशी Save बटणावर क्लिक करा.
03:51 तिच विंडो पुन्हा प्रदर्शित होते.

Output file फिल्ड दर्शवते :C:\Users\spoken\Downloads\TestData.mrk.

04:06 लक्षात ठेवा Excel Sheet Name: Sheet1 ही MarcEdit 7 द्वारे स्वयंचलितरित्या निवडली जाईल.

तथापि, हे sheet चे नाव एडिट करू शकतो.

04:20 Options सेक्शनअंतर्गत, चेकबॉक्स UTF-8 Encoded, MarcEdit 7 कडून डिफॉल्ट रूपात निवडला जातो.
04:32 त्याच विंडोच्या उजव्या बाजूस Next बटणावर क्लिक करा.
04:37 पुन्हा एक नवीन विंडो, MarcEdit Delimited Text Translator उघडते.

Data Snapshot' शीर्षक आहे.

04:48 Excel file मधील नोंदींनुसार ह्या विंडोमध्ये field चे सर्व तपशील असतील.
04:55 आपण 0 ते 8 पर्यंतचे आणि त्यावरील संबंधित व्हॅल्यूजसहित Fields पाहू.
05:03 उदाहरणार्थ, माझ्या मशीनवर Field 0 ची व्हॅल्यू 978-3-319-47238-6 (ISBN) आहे.
05:17 आपण आपल्या Excel sheet प्रमाणे वेगवेगळे व्हॅल्यू पाहू शकता.
05:22 DataSnapshot, सेक्शनच्या अंतर्गत Settings सेक्शन वर जा.
05:28 Select टॅबवर जा आणि ड्रॉप-डाऊनमधून Field 0 निवडा.
05:35 यासह आपणKoha MARC Tags सह Excel data ची mapping करणार आहोत.
05:43 लक्षात ठेवा, आपण Map To: आणि Indicators कस्टमाईज करू शकता.
05:49 तथापि, हे महत्त्वाचे आहे की Fields आणि Subfield Codes हे Koha MARC Tag प्रमाणे आहेत.
05:58 MARC Tags, वरील अधिक माहितीसाठी, Library of Congress च्या अधिकृत साईटच्या लिंकला भेट द्या.
06:07 ब्राऊजरवर, हे URL टाईप करा आणि search वर क्लिक करा.
06:15 लक्षात ठेवा की,Map To: फिल्डमध्ये प्रविष्ट केलेल्या व्हॅल्यूज ह्या सिरिजमधील पूर्वीच्या ट्युटोरिअलमधून संदर्भित केल्या आहेत.
06:24 Map To: फिल्डमध्ये मी 020$a प्रविष्ट करेन.
06:31 हा क्रम आपल्या Excel data नुसार बदलला जाईल.
06:36 मी Indicators: आणि Term. Punctuation: आहेत तसे सोडून देईन.
06:42 तथापि, आपण Koha MARC Tags द्वारे निर्देशित केल्याप्रमाणे हे फिल्ड्स भरू शकता.
06:49 पुढे Constant Data साठी चेक-बॉक्स आहे.
06:54 आपण मर्यादित टेक्स्ट डॉक्युमेंटमध्ये प्रत्येक प्रविष्ट्यासाठी डेटा फिल्डमध्ये समान माहिती, map करू इच्छित असल्यास, ह्यावर क्लिक करा.
07:04 जर तुम्हांला तेच subfield ची पुनरावृत्ती करायची असल्यास Repeatable subfield क्लिक करा.
07:10 पुढे, Add Argument बटणावर क्लिक करा.
07:15 असे केल्याने, Arguments. सेक्शनअंतर्गत असलेल्या फिल्डमध्ये व्हॅल्यू 0 020$a 0 प्रदर्शित होते.
07:25 तशाचप्रकारे, इतर सर्व fields मॅप करू.
07:30 Settings सेक्शन अंतर्गत Select वर जा. ड्रॉप-डाऊनमधून,Field 1 निवडा.
07:39 field मध्ये Map To साठी, टाईप करा :080$a.
07:46 आता, Add Argument बटणावर क्लिक करा.
07:50 असे केल्याने, Arguments सेक्शनअंतर्गत फिल्डमध्ये व्हॅल्यू 1 080$a 0 प्रदर्शित होते.
08:01 Select टॅबअंतर्गत ड्रॉप-डाऊनमधून Field 2 निवडा.
08:07 फिल्डमध्ये Map To साठी, टाईप करा : 100$a
08:13 फिल्डमध्ये Indicators साठी, टाईप करा : 1
08:17 लक्षात ठेवा की, 1 हा tag 100 चा प्रथम संकेतक(इंडिकेटर) आहे आणि तो subfield ‘a’ साठी Surname चे प्रतिनिधित्व करतो.
08:28 तशाचप्रकारे, Select अंतर्गत ड्रॉप-डाऊनमध्ये दर्शविल्याप्रमाणे,Field 13 पर्यंत सर्व फिल्ड्सचे मॅपिंग पूर्ण करा.
08:39 प्रत्येक फिल्डच्या समीप असलेले अप आणि डाऊन एरोज लक्षात घ्या.
08:44 आपण प्रदर्शित होणाऱ्या व्हॅल्यूजचा क्रम बदलण्यासाठी ह्याचा वापर करू शकता.
08:50 Arguments सेक्शन अंतर्गत, Tags' जे भिन्न sub-fields सह सामाईक(कॉमन) आहेत ते जोडणे आवश्यक आहे.
08:58 त्यासाठी, खालील गोष्टी करा- कॉमन टॅग , उदाहरणार्थ - 245$a आणि 245$c निवडा.
09:09 मग कॉमन टॅग्जवर राईट-क्लिक करा आणि ड्रॉप-डाऊनमधून Join Items निवडा.
09:17 हे अशा फिल्ड्सचा एक गट तयार करेल जे समान प्रकारचे असतात.
09:23 लक्षात ठेवा की, * (एस्टेरिस्क सिंबॉल) निवडलेल्या Tags आधी प्रदर्शित होईल.
09:29 * एस्टेरिस्क सिंबॉल सूचित करते की कॉमनtags आता जोडले आहेत.
09:35 वैकल्पिकरित्या, आपण Arguments साठी दिलेले 0 ते 13 पर्यंतचे संबंधित फिल्ड्सचे व्हॅल्यू import करण्यासाठी Auto Generate टॅबवर क्लिक करून fields ची मॅपिंग करू शकता.
09:52 तथापि, मी स्वतः(मॅन्युअली) मॅपिंग केले आहे. तर, मी Auto Generate पर्यायावर क्लिक करणार नाही.
09:59 पुढे आपण चार पर्याय पाहू.
10:02 पहिला आहे Save Template.
10:06 भविष्यातील वापरासाठी आपण mapping सेव्ह करू इच्छित असल्यास हे वापरा.
10:12 डेटा रूपांतरित करतांना जर आपणांस कोणतीही समस्या असल्यास saved template वापरला जाईल.
10:20 जर आपण Save Template पर्याय निवडत असाल तर आपल्याला त्यास नाव देण्यास आणि ते सेव्ह करण्यासाठी डायरेक्टरी निर्दिष्ट करण्यास सांगितले जाईल.
10:31 ते .mrd file' म्हणून सेव्ह केले जाईल.
10:36 विंडोच्या उजव्या बाजूला “Load Template” वर क्लिक करून भविष्यात हे template एक्सेस करा.
10:44 दुसरा पर्याय आहे Sort Fields.
10:48 तिसरा पर्याय आहे Calculate common nonfiling data.
10:54 चौथा पर्याय आहे Ignore Header Row.
10:58 जर तुमच्याकडे Excel sheet मध्ये हेडिंग्स असेल आणि तुम्हांला हेडिंग्सकडे दुर्लक्ष करणे आवश्यक असेल तर येथे क्लिक करा.
11:05 यांपैकी, Sort Fields आणिCalculate common nonfiling data हे MarcEdit 7 द्वारे स्वयंचलितरित्या निवडलेले आहेत.
11:15 मी ते जसे आहेत तसे सोडून देणार आहे.
11:18 आता, मी Save Template आणि Ignore Header Row साठी चेक-बॉक्स तपासेन.
11:26 पुढे, पृष्ठाच्या वरील उजव्या कोपऱ्यावरील Finish टॅब वर जा आणि त्यावर क्लिक करा.
11:34 असे केल्यावर, Save File विंडो उघडेल, आपल्याला File name भरण्यास सूचित करते.
11:41 त्याच विंडोवर डाव्या बाजूला असलेल्या Downloads फोल्डरवर क्लिक करा.
11:48 आणि, File name साठी field मध्ये मी टाईप करेन - TestData.
11:54 आता, पृष्ठाच्या तळाशी Save बटणावर क्लिक करा.
11:59 Process has been finished. Records saved to: C:\Users\Spoken\Download\TestData.mrk संदेशासह पॉप-अप विंडो उघडते.
12:14 ह्या डायलॉग-बॉक्सच्या तळाशी असलेल्या Ok बटणावर क्लिक करा.
12:19 यासह .mrk file Downloads फोल्डरमध्ये यशस्वीरित्या सेव्ह केली गेली आहे.
12:29 एक नवीन पृष्ठ MarcEdit 7.0.250 By Terry Reese उघडते.

'MarcEditor आयकॉनवर जा आणि क्लिक करा.

12:42 एक नवीन पृष्ठ MarcEditor उघडते.

मुख्य Menu वर, File वर क्लिक करा आणि ड्रॉपडाऊनमधून Open निवडा.

12:55 Open File विंडो उघडते, आणि TestData.mrk फाईल प्रदर्शित करते.
13:02 क्लिक करून TestData.mrk file निवडा.
13:07 हे File name साठी फिल्डमध्ये दर्शवेल.
13:11 आता विंडोच्या तळाशी Open वर क्लिक करा.
13:16 आणखी एक विंडो MarcEditor: TestData.mrk सर्व तपशीलांसह उघडेल.
13:24 त्याच विंडोवर, मेन मेन्यूमधून File वर क्लिक करा.
13:29 आता, ड्रॉप-डाऊनमधून Compile File into MARC निवडा.
13:35 आणखी एक नवीन विंडो Save File उघडते.
13:39 येथे, File Name: वर जा आणि field मध्ये योग्य नाव टाईप करा.
13:46 मी टाईप करेन - TestData.
13:50 डीफॉल्टनुसार, Koha, Save as type: फिल्डमध्ये MARC Files (*.mrc) निवडतो.
14:00 आता, विंडोच्या तळाशी असलेल्या Save बटणावर क्लिक करा.
14:06 असे केल्यावर, तळाशी असलेल्या त्याच विंडोवर, आपण 5 records processed in 0.166228 seconds पहाल.
14:19 कारण मी केवळ 5 records इम्पोर्ट केले आहेत. आपल्याला आपल्या डेटानुसार records ची एक वेगळी संख्या आणि प्रक्रियेची वेळ दिसेल.
14:29 यासह, आपण आपल्या लायब्ररीचा Excel data Marc 21 format मध्ये यशस्वीरित्या रूपांतरित केला आहे.
14:37 Marc 21 format हे Koha मध्ये वापरलेले एक मानक स्वरूप आहे, जे Koha मध्ये डेटा कॅटलॉगिंग आणि इम्पोर्टिंगकरिता वापरले आहे.
14:46 आता ही विंडो बंद करा. असे करण्यासाठी, वरील उजव्या कोपऱ्यात जा आणि Close बटणावर क्लिक करा.
14:55 सारांशित करू. ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो - 64-bit Windows मशीनवर Excel data Marc 21 format मध्ये रुपांतरित करणे.
15:08 असाईनमेंट :

Excel मध्ये 10 records ची सूची तयार करा आणि ते रेकॉर्ड्स MarcEdit 7 वापरून MARC मध्ये रूपांतरित करा.

15:20 खालील लिंकवरील व्हिडिओ Spoken Tutorial project चा सारांश देतो.

कृपया तो डाऊनलोड करून पहा.

15:27 Spoken Tutorial Project टीम कार्यशाळा चालविते आणि प्रमाणपत्रही देते.

अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा.

15:35 ह्या फोरममध्ये आपले कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
15:39 "स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट" साठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India ह्यांच्याकडून मिळालेले आहे.
15:45 ह्या मिशनवरील अधिक माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे.
15:50 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana