Health-and-Nutrition/C2/Importance-of-breastfeeding/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:00 स्तनपानाचे महत्त्व ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत :
00:09 स्तनपानाचे महत्त्व.
00:12 बाळ आणि मातांना स्तनपानाचे फायदे
00:17 स्तनपान ही एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे.
00:19 हे मुलाच्या जन्मापासून ते दोन वर्षापर्यंत किंवा त्याहून अधिक काळ सुरू राहते.
00:26 स्तनपानामुळे बाळाच्या आयुष्याची निरोगी सुरुवात होते.
00:31 हे मूल आणि आईचे भविष्यातील आरोग्य त्वरित ठरवते.
00:38 त्याचा फायदा ह्या दोघांसाठी आयुष्यभर टिकतो.
00:43 कुपोषित मातासुद्धा आपल्या बाळाला स्तनपान देऊ शकतात.
00:49 गर्भधारणेदरम्यान, स्तनाचा आकार वाढतो.
00:53 हे दूध उत्पादनाच्या ऊतींच्या संख्येत वाढ झाल्यामुळे आहे.
00:59 तथापि, स्तनांच्या अंतिम आकाराचा दुधाच्या उत्पादनावर परिणाम होत नाही.
01:07 जन्माच्या एका तासाच्या आत स्तनपान सुरू केले पाहिजे.
01:13 ह्यामुळे आईच्या दुधाचा पुरवठा वाढतो.
01:17 म्हणूनच, पहिल्या 6 महिन्यांत केवळ स्तनपानदेखील वाढते.
01:24 हे पुढे जाऊन स्तनपान 2 वर्षापेक्षा जास्त वाढविण्यात मदत करते.
01:31 एका तासाच्या आत स्तनपान करणार्‍या बाळांमध्ये नवजात मृत्यूचा धोका कमी असतो.
01:39 स्तनपानास विलंब केल्यामुळे नवजात शिशूंमध्ये आजार होण्याचा धोका वाढू शकतो.
01:47 उदाहरणार्थ, मधुमेह, लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाब.
01:53 स्तनपानाची लवकर सुरुवात बाळाला कोलोस्ट्रम मिळते ह्याची खात्रीदेखील देते.
02:00 कोलोस्ट्रम हे बाळाला जन्म दिल्यानंतर आईने स्रावित केलेले पहिले दूध आहे.
02:07 मुलांसाठी, हे ऊर्जा आणि पोषक घटकांचे प्राथमिक स्रोत आहे.
02:13 त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्यासाठी हे महत्त्वाचे आहे.
02:20 यात मोठ्या संख्येने संसर्ग-लढाऊ घटक आहेत,
02:24 जीवनसत्त्व अ आणि
02:26 चांगली चरबी.
02:28 कोलोस्ट्रममध्ये वाढ आणि संरक्षणात्मकाचे असंख्य घटकही आहेत.
02:35 कोलोस्ट्रममध्ये गुणधर्म आहे जे आधीची विष्ठा जलद काढून टाकण्यास मदत करते.
02:42 दुसर्‍या ट्युटोरिअलमध्ये कोलोस्ट्रमचे फायदे ह्यांची विस्तृत चर्चा केली आहे.
02:48 कृपया अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या (वेबसाईट पहा).
02:52 लक्षात ठेवा की विशेष स्तनपान पहिल्या 6 महिन्यांपर्यंत दिले पाहिजे.
02:59 आईचे दूध एक अद्वितीय नैसर्गिक खाद्य आहे ज्याची दुसरी प्रत शक्य नाही.
03:05 जेव्हा बाळ 6 महिने पूर्ण करते तेव्हा पूरक अन्न सुरू केले पाहिजे.
03:12 हे आईच्या दुधासोबत द्यावे.
03:16 स्तनपान 2 वर्षांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ चालू ठेवले पाहिजे.
03:22 बाळांना स्तनपानाचे बरेच फायदे आहेत.
03:27 पोषक घटक आणि आईच्या दुधाची रचना बाळांकडून पचनास आदर्श आहे.
03:34 स्तनपानाद्वारे बाळांना प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) प्राप्त होतात.
03:38 प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) बाळाची प्रतिकारशक्ती मजबूत करते आणि संक्रमणाचा धोका कमी करते.
03:46 ह्या व्यतिरिक्त, ते बाळांमध्ये अ‍ॅलर्जिक प्रतिक्रिया प्रतिबंधित करते.
03:52 आईच्या दुधात वाढीचे घटकदेखील असतात.
03:56 ते बाळाच्या आतड्यांच्या अस्तराच्या वाढीस मदत करतात.
04:02 हे बाळाच्या आतड्यात चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस प्रोत्साहन देते.
04:08 अशाप्रकारे हे बाळाचे आतड्यांसंबंधी जळजळ आणि संसर्गापासून संरक्षण करते.
04:16 त्याचप्रमाणे, हे शरीराच्या इतर अवयवांच्या विकासास मदत करते.
04:22 स्तनपान अतिसाराचा धोका कमी करते.
04:27 इतर फायदे आहेत – कानातील संसर्ग रोखणे
04:31 आणि दात किडणे.
04:33 जबड्यांचा विकास आणि दातांचे योग्य संरेखन ही इतर काही उदाहरणे आहेत.
04:41 आयुष्यात नंतर काही आजार होण्याचा धोकाही कमी होतो.
04:48 उदाहरणार्थ, मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि रक्त कर्करोग.
04:56 दमा आणि न्यूमोनियासारख्या श्वसन रोगांचा धोकादेखील कमी होतो.
05:04 स्तनपान केल्यामुळे एका वर्षाखालील मुलांमध्ये अचानक मृत्यूची शक्यता कमी होते.
05:14 स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये एटॉपिक एक्जिमा विकसित होण्याचा धोकाही कमी आहे.
05:22 एक्जिमा ही अशी स्थिती आहे ज्यात त्वचा लाल होते, त्वचेला खाज सुटते आणि खडबडीत चट्टे उठतात.
05:30 स्तनपान करणाऱ्या मुलांना आजारपण आणि संसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्याची शक्यताही कमी असते.
05:39 स्तनपान करणार्‍या मुलांच्या भूकेवर अधिक चांगले नियंत्रण असते.
05:44 आईच्या दुधात भूक नियंत्रित करणारे संप्रेरक (हार्मोन्स) असतात.
05:48 अशा संप्रेरकांमुळे (हार्मोन्समुळे) मुलांना त्यांच्या शरीराची भूक आणि तृप्तीचे संकेत ऐकण्यास मदत होते.
05:57 स्तनपान न केलेल्या बाळांमध्ये हे स्वयं-नियमन विचलित झाले आहे.
06:03 अखेरीस यामुळे जास्त खाणे,
06:07 लठ्ठपणा आणि नंतर मधुमेह होऊ शकते.
06:11 स्तनपानाचा मेंदूवरही परिणाम होतो.
06:15 आईच्या दुधात असे घटक असतात जे मेंदूचा विकासात आणि परिपक्वतेत मदत करतात.
06:23 स्तनपान करणार्‍या मुलांचे बुद्ध्यांक आणि इतर कौशल्ये जास्त असतात.
06:28 आईच्या दुधाचा अकाली जन्मलेल्या बाळांना अधिक फायदा होतो.
06:34 स्तन चोखल्यामुळे अशा मुलांचे श्वासोच्छ्वास सुधारते.
06:40 ह्या मुलांना आतड्यांसंबंधी संसर्ग होण्याचा धोका असतो.
06:47 उदाहरणार्थ : अतिसार आणि नेक्रोटिझिंग एन्टरोकॉलिटिस ज्याला 'एनईसी' म्हणून ओळखले जाते.
06:56 'एनईसी' ही एक आतड्यातील संसर्ग आणि क्षतीमुळे होणारी गंभीर स्थिती आहे.
07:05 आईचे दूध अकाली जन्मलेल्या बाळांना ह्या संसर्गापासून वाचवते.
07:11 अकाली जन्मलेल्या बाळांच्या मातांचे दूध संसर्ग लढाऊ प्रथिनांनी समृद्ध आहे.
07:19 यात आतड्यांसंबंधी संरक्षणात्मक वाढीस प्रोत्साहित करणारे घटकदेखील आहेत.
07:25 विशिष्ट अमीनो आम्ल आणि चांगले बॅक्टेरियादेखील (जीवाणू) उच्च प्रमाणात आहेत.
07:33 अकाली जन्मलेल्या अर्भकांच्या वाढीसाठी हे अमीनो आम्ल आवश्यक आहेत.
07:40 अशाप्रकारे, आईचे दूध संक्रमण रोखण्यात
07:43 आणि वजन वाढविण्यात मदत करते.
07:46 स्तनपानामुळे अकाली जन्मामुळे होणारी दीर्घकालीन समस्या कमी होतात.
07:52 उदाहरणार्थ, फुफ्फुस आणि डोळे यांच्या समस्या.
07:57 अशाप्रकारे, अकाली जन्मलेल्या बाळांना जास्तीत जास्त आईचे दूध मिळावे.
08:04 केएमसी म्हणून ओळखल्या जाणारी कंगारू मदर केअरदेखील अकाली जन्मलेल्या बाळांसाठी उपयुक्त आहे.
08:12 हे त्यांच्यात स्तनपान करण्याची वारंवारता आणि कालावधी सुधारते.
08:18 केएमसी दरम्यान आईचा व बाळाचा अनावृत्त स्पर्शादरम्यान बाळाच्या शरीराचे तापमान राखण्यात मदत होते.
08:27 हे बाळाच्या हृदयाचे ठोके आणि रक्तातील ऑक्सिजनची पातळी स्थिर करण्यास मदतदेखील करते.
08:35 दुसर्‍या ट्युटोरिअलमध्ये 'कांगारू मदर केअर' ची प्रक्रिया स्पष्ट केली आहे.
08:42 बाळांव्यतिरिक्त, स्तनपान हे मातांसाठीदेखील फायदेशीर आहे.
08:48 फायदे त्वरित आणि दीर्घकालीन आहेत.
08:53 बाळंपणानंतर ताबडतोब स्तनपान दिल्यामुळे योनीतून रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते.
08:59 हे शरीरात ऑक्सिटोसिन संप्रेरकची (हार्मोनची) पातळी वाढवते.
09:05 हे नाळ शरीरातून बाहेर काढण्यात मदत करते.
09:09 परिणामी गर्भाशयाचे आकुंचन सुधारते आणि योनीतून रक्तस्त्राव कमी होतो.
09:17 अशाप्रकारे, मातांमधील अशक्तपणा टाळता येतो.
09:21 मातांसाठी स्तनपानाचे मानसिक फायदे आहेत.
09:27 वारंवार आईचा व बाळाचा अनावृत्त स्पर्शाच्या संपर्कात राहण्यामुळे आई आणि तिचे बाळ यांच्यात संबंध वाढतात.
09:35 हे संबंध आईला स्तनपान देण्यास तयार करते.
09:39 शेवटी, यामुळे मातांमध्ये प्रसुतीनंतरचा ताण आणि नैराश्य कमी होते.
09:46 स्तनपानाचे मातांना दीर्घकालीन फायदेही आहेत.
09:51 हे नंतरच्या काळात हाडे कमकुवत होण्यापासून रोखते.
09:56 स्तन आणि बीजकोशाच्या कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो.
10:02 गर्भधारणेदरम्यान, स्त्रियांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांच्या आसपासची चरबी वाढते.
10:08 जसे की पोट, आतडे आणि यकृत.
10:12 ही चरबी पोट किंवा ओटीपोटाच्या भागात लपलेली असते.
10:18 ह्या चरबीचे प्रमाण वाढल्यास इन्सुलिन रेझिस्टन्स,
10:23 मधुमेह आणि लठ्ठपणा होऊ शकतो.
10:26 स्तनपान महिलांमधील ही चरबी कमी करण्यास मदत करते.
10:31 हे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी करते.
10:37 केवळ स्तनपान ही एक नैसर्गिक जन्म नियंत्रण म्हणून कार्य करू शकते.
10:44 तथापि, जोडप्यांनी प्रसुतीनंतर 6 आठवड्यांनंतर गर्भनिरोधक वापरावे.
10:50 हे दोन गर्भधारणेदरम्यान अवकाश राखण्यास मदत करते.
10:56 स्तनपानाचे काही आर्थिक फायदे आहेत.
11:00 आईचे दूध विनामूल्य उपलब्ध आहे आणि बाळासाठी सर्वोत्कृष्ट आहे.
11:07 यात फॉर्मुला दूध, बाटल्या आणि प्लास्टिकच्या निप्पल्सवर खर्च केलेल्या पैशाचा समावेश नाही.
11:14 आईचे दूध तयार करण्यासाठी अतिरिक्त वेळदेखील खर्च केला जात नाही.
11:20 आईचे दूध तयार करण्यासाठी गरम पाणी, भांडी आणि तापवण्यासाठी इंधन आवश्यक नाही.
11:28 घाणेरडे पाणी किंवा घाणेरड्या पाजायच्या बाटल्या बाळाला आजारी बनवू शकतात.
11:35 अशाप्रकारे, भविष्यात आई आणि बाळासाठी आरोग्यासाठी लागणारा खर्च कमी आहे.
11:42 स्तनपानाचे अनेक पर्यावरणीय फायदेदेखील आहेत.
11:47 सर्वप्रथम, स्तनपानात कोणतेही पॅकेजिंग किंवा वाहतूक समाविष्ट नाही.
11:54 यामुळे कोणताही कचरा,
11:57 धूर किंवा आवाज होत नाही
12:00 हे जागतिक संसाधने आणि ऊर्जा वाचवून प्रदूषण कमी करते.
12:06 म्हणूनच, स्तनपान हा एक उत्तम पर्याय आहे.
12:10 मातांनी बाळाला जन्मापासून 2 वर्षापर्यंत स्तनपान देण्याचे सुनिश्चित केले पाहिजे.
12:18 हे बाळ आणि आईच्याही चांगल्या आरोग्यासाठी आहे.
12:24 स्तनपानासाठी योग्य स्तनपानाच्या तंत्राची समज आवश्यक आहे.
12:30 त्याबरोबरच, कुटुंबाकडून पुरेसा आधार व मार्गदर्शनही आवश्यक आहे.
12:38 ह्या सगळ्याचे स्पष्टीकरण त्याच मालिकेच्या दुसर्‍या ट्युटोरिअलमध्ये दिले आहे.
12:44 ह्यासह आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Latapopale