FrontAccounting-2.4.7/C2/Banking-and-General-Ledger-in-FrontAccounting/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:39, 1 June 2020 by Manali (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Banking and General Ledger in Front Accounting वरील पाठात आपले स्वागत.
0:07 या पाठात तयार करायला शिकणार आहोतः

General Ledger Classes

00:13 General Ledger Groups आणि

General Ledger Accounts

00:18 या पाठासाठी मी वापरत आहेः

Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 16.04

00:26 FrontAccounting वर्जन 2.4.7.
00:30 या पाठाच्या सरावासाठी उच्च माध्यमिक कॉमर्स आणि अकाउंटिंग तसेच बुककीपींगच्या तत्वांचे ज्ञान असावे
00:40 आणि तुम्ही आधीच FrontAccounting मधे एक Organisation/Company सेटअप केलेली असावी.
00:46 नसल्यास या वेबसाईटवरील संबंधित FrontAccounting चा पाठ बघा.
00:52 FrontAccounting च्या इंटरफेसवर काम सुरू करण्यापूर्वी XAMPP सर्व्हिसेस सुरू करा.
00:58 आता FrontAccounting चा इंटरफेस उघडू.
01:01 ब्राऊजर उघडून localhost slash account टाईप करून Enter दाबा.
01:09 login पेज उघडेल.
01:12 युजरनेम म्हणून admin आणि पासवर्ड टाईप करा.

Login बटणावर क्लिक करा.

01:20 FrontAccounting चा इंटरफेस उघडेल.
01:23 Banking and General Ledger टॅब क्लिक करा.
01:27 Maintenance पॅनेलमधे हे पर्याय दिसतील:

GL Accounts

01:33 GL Account Groups आणि

GL Account Classes.

01:38 कोणतेही transaction सुरू करण्यापूर्वी Charts of Accounts सेट करणे गरजेचे आहे.
01:43 FrontAccounting मधील Charts of Accounts हे Type, Class, Group आणि Account यांनी पारिभाषित होतात.
01:50 सर्व transactions ही Account, Group आणि Classes यांना चार्ज केली जातात.
01:56 यांचा उपयोग करून reporting purposes साठी transactions चे गट बनवले जातात.
02:00 FrontAccounting मधे Account हे एखाद्या Group मधे आणि Group हे एखाद्या Class मधे असतात.
02:06 याचे प्रतिबिंब Balance Sheet आणि Profit and Loss account statements मधे Account Group प्रमाणे दिसते.
02:13 FrontAccounting च्या इंटरफेसवर परत जाऊ.
02:17 General Ledger Account Classes सेट करणे ही पहिली पायरी आहे.
02:22 Maintenance पॅनेलमधील GL Account Classes लिंक क्लिक करा.
02:27 येथे डिफॉल्ट रूपात Class Name आणि Class Type हे अशाप्रकारे निश्चित केले आहेत:

Assets , Liabilities , Income आणि Expense

02:38 तसेच प्रत्येक Class Type साठी एक Class ID सेट केलेला आपल्याला दिसेल.
02:44 Account Group चे सेटिंग करण्यापूर्वी class सेट करणे गरजेचे आहे.
02:49 आता नवा class कसा समाविष्ट करायचा ते बघू.
02:53 Class ID फिल्डमधे 5 टाईप करा. Class ID ची व्हॅल्यू युनिक असली पाहिजे.
03:00 Class Name फिल्डमधे Equity टाईप करा.
03:04 Class Type च्या ड्रॉपडाऊन बॉक्सवर क्लिक करा.

आपण Assets , Liabilities, Equity, Income, Cost of Goods Sold आणि Expense ही डिफॉल्ट सूची बघू शकतो.

03:21 हे Class Type FrontAccounting च्या Balance Sheet मधे दाखवले जातात.
03:26 Class Type साठी Equity पर्याय निवडा.
03:29 विंडोच्या खालील भागात असलेले Add new बटण क्लिक करा.
03:33 'New account class has been added' असा मेसेज दिसेल.
03:38 येथे तिसऱ्या ओळीत “Equity” हा नवा class समाविष्ट झालेला दिसेल.
03:44 कारण डिफॉल्ट रूपात Equity हा Class Type तिसऱ्या श्रेणीबध्द स्तरावर आहे.
03:50 एखादा नवा Class समाविष्ट झाल्यास तो त्या Class Type ची डिफॉल्ट जागा घेईल.
03:56 आता GL Groups कसे समाविष्ट करायचे ते पाहू.
04:00 Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा.
04:03 Maintenance पॅनेलमधील GL Account Groups लिंक क्लिक करा.
04:08 आपल्याला दिसेल की, Class च्या खाली डिफॉल्ट Group Name आहेत, जे GL Account Groups दाखवतात.
04:15 Class प्रमाणे Group ID सेट केल्याचे बघू शकतो.
04:20 ID फिल्डमधे, 12 हा नवा Group ID टाईप करा.
04:24 Name फिल्डमधे Group Name म्हणून Fixed Assets टाईप करा.
04:29 आधी असलेल्या कोणत्याही subgroupशी “Fixed Assets” हे Group Name संबंधित नाही.
04:35 म्हणून Subgroup फिल्डमधे None हाच पर्याय ठेवा.
04:40 आता Class च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.
04:44 Charts of Accounts नुसार Fixed Assets हे Assets या class खाली येते.

म्हणून Class साठी Assets पर्याय निवडा.

04:53 हे बदल सेव्ह करण्यासाठी विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा.
04:59 आपल्याला "This account Group ID is already in use" हा एरर मेसेज दिसेल.
05:06 त्यामुळे प्रत्येक Group Name साठी युनिक Class ID देणे गरजेचे आहे.
05:11 Group ID बदलून तो 13 करू.
05:15 विंडोच्या खालील भागातील Add new बटण क्लिक करा.
05:19 यावेळी "New account type has been added" हा मेसेज दिसेल.
05:25 class “Assets” मधे नवीन Group Name यादृच्छिकपणे (रँडमली) समाविष्ट होईल.
05:30 असे आपण स्वतःचे Group Name समाविष्ट करू शकतो.
05:34 आता GL Accounts कसे समाविष्ट करायचे ते पाहू.
05:38 Banking and General Ledger टॅबवर क्लिक करा.
05:42 नंतर Maintenance पॅनेलमधील GL Accounts लिंक क्लिक करा.
05:47 येथे युनिक कोड टाईप करणे गरजेचे आहे. हे फिल्ड अनिवार्य आहे.
05:53 Account Code फिल्डमधे मी 1100 हा कोड टाईप करत आहे.
06:00 तुमच्या पसंतीचा कोड देखील देऊ शकता.
06:04 Account Name फिल्डवर क्लिक करा.

"Land and Building" हे Account Name टाईप करा.

06:11 तुम्ही तुमच्या पसंतीचे नाव द्या.
06:14 Account Group च्या ड्रॉपडाऊन बॉक्समधे Fixed Assets हा Account Group निवडा.
06:20 Charts of Accounts नुसार Land and Building हे Account Name Fixed Assets या Group खाली असले पाहिजे.
06:28 पुढे Account status या ड्रॉपडाऊन मेनूवर क्लिक करा.

Active हे status निवडा.

06:35 विंडोच्या खालील भागातील Add Account बटण क्लिक करा.
06:40 "New account has been added" हा मेसेज दिसेल.
06:45 आता वरच्या भागातील New account या ड्रॉपडाऊनवर क्लिक करा.

येथे नवीन समाविष्ट झालेला Account दिसेल.

06:54 येथे दाखवल्याप्रमाणे प्रत्येक संस्थेचा स्वतःचा account codes चा सेट असेल.
07:00 तसेच वरील स्टेप्सचे अनुसरण करून आपले स्वतःचे GL Accounts तयार करू शकतो.
07:06 अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात,

07:12 या पाठात आपण,

General Ledger Classes , General Ledger Groups and General Ledger Accounts तयार करायला शिकलो.

07:22 असाईनमेंट-

खालील तपशील वापरून - Cash आणि Capital ही नवी GL Accounts बनवा. हे बदल सेव्ह करा.

07:31 आता आपल्या कंपनीसाठी नवीन GL Accounts असलेले Charts of Accounts सेट केलेले आहेत.
07:38 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.

हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.

07:46 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.

अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

07:55 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
07:59 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:05 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali