Firefox/C2/Searching-and-Auto-complete/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 10:48, 29 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Firefox Searching and Auto-complete

Author: Manali Ranade

Keywords: Mozilla Firefox


Visual Clue
Narration
00:00 Firefoxमधील Search आणि Auto complete या फीचर्सच्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00:06 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत Search करणे, Search Engines नियंत्रित करणे, Find bar चा वापर करणे
00:15 Auto-complete चा Address bar मध्ये वापर करणे.
00:18 या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu Linux 10.04 वरFirefoxचे version 7.0 वापरणार आहोत.
00:26 सर्वसाधारणपणे अनेक व्यक्ती इंटरनेटचा वापर माहितीचा शोध घेण्यासाठी करतात.
00:31 तर काहीजण विशिष्ट वेबसाईट किंवा इतर माहिती शोधतात.
00:37 Mozilla Firefox मध्ये अशा अनेक सुविधा आहेत ज्यामुळे इंटरनेटवर माहिती शोधणे सोपे होते.
00:44 आपण त्यापैकी काही पर्याय बघू या.
00:47 एक म्हणजे इतर वेबसाईटस वर जाऊन सर्च करणे.
00:50 सर्च इंजिन या वेबसाईट देखील असतात.
00:54 URL barवर www.google.comटाईप करा.
00:59 गुगलचे होमपेज उघडेल.
01:01 गुगलच्या होमपेजवरीलsearch box मध्ये email असे टाईप करून Search वर क्लिक करा.
01:07 search engine आपल्याला सर्व रिझल्टस दर्शवेल.
01:10 आपल्याला असे दिसेल की सर्वात वरचा रिझल्ट gmail आहे, जी गुगलची email सुविधा आहे.
01:16 परंतु हीच गोष्ट आपल्याला Mozilla Firefox द्वारे सोप्या पध्दतीने करता येते.
01:20 navigation toolbar वरील URL bar च्या पुढे एक Search bar field आहे.
01:26 किंवा CTRL+K ही बटणे दाबून तुम्ही Search barवर जाऊ शकता.
01:33 Search barवर क्लिक करा आणि email टाईप करा.
01:36 त्याच्या पुढील magnifying glass च्या आयकॉनवर क्लिक करा.
01:40 याचा रिझल्ट आपल्याला contents area मध्ये दिसेल.
01:44 आपल्याला सर्वात वरचा रिझल्ट gmail, the email from google असा दिसेल.
01:50 सर्च बारच्या डावीकडे वापरल्या जाणा-या search engineचा लोगो दाखवलेला असतो.
01:58 Mozilla Firefox मध्ये गुगल हे डिफॉल्ट रूपात search engine म्हणून वापरले जाते.
02:02 पण आपण तेच वापरणे बंधनकारक नाही. आपल्या आवडीचे search engine देखील वापरू शकतो.
02:08 Search barवरील गुगलच्या search engine लोगोवर क्लिक करा.
02:12 आपल्याला लक्षात येईल की ड्रॉप डाऊनमध्ये Yahooआणि Bing सारखी अतिशय लोकप्रिय search engine लोगोसहित दिसतील.
02:21 drop down मधील Yahoo पर्याय निवडा.
02:24 आपल्याला दिसेल की Search barच्या डाव्या बाजूला असलेला लोगो बदलून आता तेथे Yahooचा लोगो आला आहे.
02:30 आता Search barमध्ये पुन्हा email असे टाईप करून magnifying glass च्या आयकॉनवर क्लिक करा.
02:36 यावेळी Yahooच्या search engine मधून मिळालेला रिझल्ट आपल्या Contents area मध्ये दिसेल.
02:42 गेल्या वेळेपेक्षा आता मिळालेला रिझल्ट थोडा वेगळा आहे.
02:46 आता सगळ्यात वरचा रिझल्ट gmail राहिलेला नाही. त्याऐवजी Yahoo mail सगळ्यात वर दिसेल.
02:53 Search bar वरील search engine लोगोवर पुन्हा क्लिक करा.
02:57 drop down मधील Manage Search Engines हा पर्याय निवडा.
03:01 Manage Search Engine list नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
03:07 सूचीतील सर्वात शेवटच्या पर्यायावर क्लिक करा.
03:10 आता उजव्या बाजूची बटणे enabled होतील. Remove बटणावर क्लिक करा.
03:16 आपल्याला दिसेल की आपण निवडलेला घटक आता सूचीमध्ये उपलब्ध नाही.
03:21 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी OK या बटणावर क्लिक करा.
03:24 Search bar वरील search engine लोगोवर क्लिक करा.
03:29 Manage Search Engine वर क्लिक करा.
03:32 Manage Search Engine list नामक डायलॉग बॉक्स उघडेल.
03:37 डायलॉग बॉक्सच्या तळाशी Get more search engines अशी लिंक आहे.
03:42 त्यावर क्लिक करा.
03:43 नवीन ब्राउजर टॅब उघडेल.
03:46 हे आपल्याला अनेक search engine दर्शवेल जे आपण Search bar मध्ये समाविष्ट करू शकतो.
03:51 आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यापैकी कुठलेही search engine समाविष्ट करू शकतो.
03:55 टॅबच्या कोप-यातील फुलीवर क्लिक करून तो टॅब बंद करा.
04:00 आपण Find bar च्या मदतीने Contents area मधले एखादे विशिष्ट टेक्स्ट शोधू शकतो.
04:07 URL bar वर www.gmail.com टाईप करून एंटर दाबा.
04:13 जेव्हा gmailचे होमपेज उघडेल तेव्हा Edit मेनूमधील Find वर क्लिक करा.
04:19 ब्राऊजर विंडोच्या खाली Find बार उघडेल.
04:22 Find बारच्या टेक्स्ट बॉक्समध्ये gmailअसे टाईप करा.
04:28 टाईप करताना आपल्याला दिसेल की, त्या टेक्स्टचा Contents area मधील पहिला नमुना highlight झालेला आहे.
04:36 Next वर क्लिक केल्यावर फोकस शब्दाच्या पुढील नमुन्यावर जाईल.
04:41 Previous क्लिक केल्यावर फोकस शब्दाच्या मागील नमुन्यावर जाईल.
04:46 Highlight all या पर्यायावर क्लिक करा.
04:49 Contents area मधील आपण शोधत असलेल्या टेक्स्टचे सर्व नमुने Highlightझालेले दिसतील.
04:56 Mozilla Firefox मध्ये auto-complete च्या मदतीने URL बारमध्ये टाईप करणे सोपे होते.
05:04 आपल्याला address bar मध्ये संपूर्ण web address टाईप करण्याची आवश्यकता नाही.
05:08 हे करून बघा. address bar वर gma टाईप करा.
05:12 आपल्याला दिसेल की Firefox आपण टाईप करत असलेला शब्द पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
05:17 gma ने सुरू होणा-या वेबसाईट सूची असलेला एक ड्रॉपडाऊन उघडेल.
05:23 ड्रॉपडाऊन मधील gmail ही लिंक निवडा.
05:27 Contents area मध्ये gmail चे वेबपेज उघडताना दिसेल.
05:30 आपल्याला ही सुविधा नको असल्यास आपण ती बंद करू शकतो.
05:34 Edit वर क्लिक करून नंतर Preferences वर जा.
05:37 विंडोजच्या युजरनी Tools वर क्लिक करून Options वर जा.
05:41 Tabsच्या सूचीतून Privacy हा टॅब निवडा.
05:46 डायलॉग बॉक्समध्ये ते सगळ्यात खाली When using location bar, suggest: नामक पर्याय आहे.
05:53 ड्रॉपडाऊन उघडण्यासाठी त्याच्या arrow वर क्लिक करा.
05:56 सूचीतून Nothing हा पर्याय निवडा.
05:59 डायलॉग बॉक्स बंद करण्यासाठी Close बटणावर क्लिक करा.
06:03 पुन्हा address bar वर जाऊन gma टाईप करा. लक्ष द्या की आता आपल्याला कुठलीही सूचना दिली जात नाही.
06:09 आपण आता Firefox च्या Searching and Auto-complete फीचरवरील Spoken Tutorial च्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
06:16 या ट्युटोरियमध्ये आपण शिकलो Search करणे, Search Engine नियंत्रित करणे, find barचा वापर आणि Address bar मध्ये Auto-compete चा वापर करणे.
06:27 COMPREHENSION TEST ASSIGNMENT
06:30 search bar वरील search engine बदलून ते Yahoo करा.
06:34 spoken tutorial साठी शोध घ्या.
06:36 पहिल्या रिझल्टवर क्लिक करा.
06:40 त्या पानावर video हा शब्द किती वेळा आला आहे ते शोधा.
06:44 वेबपेजवरील video या शब्दाचे सर्व नमुने Highlight करण्यासाठी Highlight all वर क्लिक करा.
06:51 सदर प्रकल्पाची माहिती देणारा video लिंकवर उपलब्ध आहे.
06:54 ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:58 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण video download करूनही पाहू शकता.
07:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:08 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:11 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
07:18 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
07:22 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
07:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:41 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana, Sneha