Firefox/C2/Introduction/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 14:50, 27 November 2012 by Sneha (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Introduction to Mozilla Firefox

Author: Manali Ranade

Keywords: Mozilla Firefox


Visual Clue
Narration
00:00 Mozilla Firefox चा परिचय करून देणा-या Spoken tutorial मध्ये आपले स्वागत.
00:05 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत
00:10 Mozilla Firefox म्हणजे काय?
00:12 Firefox कशासाठी?
00:14 Versions, System Requirements, Download तसेच Firefox Install करणे आणि website उघडणे.
00:21 Mozilla Firefox किंवा थोडक्यात Firefox हे एक विनामूल्य आणि मुक्तपणे उपलब्ध असलेले वेबब्राऊजर आहे.
00:27 Ubuntu Linux चे हे डिफॉल्ट वेब ब्राऊजर असून जे आपल्याला इंटरनेटचे जग खुले करून देते.
00:33 हे आपल्याला इंटरनेट वेब पेजेस बघण्याची आणि नेव्हिगेट करण्याची सुविधा देते.
00:39 हे Google,Yahoo Search किंवा Bing सारख्या सर्च इंजिनच्या सहाय्याने वेबपेजेस देखील शोधते.
00:47 Mozilla Firefox हे Mozilla Foundation या सेवाभावी संस्थेच्या प्रोग्रॅमर्सनी विकसित केले आहे.
00:54 Mozilla विषयी अधिक माहितीसाठी mozilla.org या संकेत स्थळाला भेट द्या.
00:59 Firefoxहे Windows, Mac OSX, and Linux या Operating Systems वर काम करते.
01:05 Ubuntu वरील Konqueror, Google Chrome आणि Opera ही इतर लोकप्रिय वेबब्राऊजरची उदाहरणे आहेत.
01:12 या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu Linux 10.04 वर Firefox चे version 7.0 वापरणार आहोत.
01:20 Firefox च्या ब्राऊजिंग मध्ये प्रायव्हसी, गती आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांचा सुरेख संगम आहे.
01:27 यात tabbed windows, built-in spell checking, pop-up blocker, integrated web search, Phishing protection सारखी अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत.
01:39 Firefox वेब ब्राऊजिंग बरोबरच चित्रांचे व वेब पेजेसचे सादरीकरण जलद करू शकते.
01:45 तसेच ते आपल्याला खोट्या वेबसाईट, spyware and viruses, trojans किंवा इतर malware पासून बचाव करण्यासाठी अनेक प्रकारच्या सुरक्षा आणि प्रायव्हसी प्रदान करते.
01:56 शिवाय Firefox मध्ये युजरच्या गरज व आवडीनुसार add-ons सॉफ्टवेअर्सच्या सहाय्याने रूपात व सोयी सुविधांमध्ये बदल करता येतो.
02:06 Fedora, Ubuntu, Red Hat, Debian आणि SUSE सारख्या लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमवर Firefox सुरू करण्यासाठी या काही System Requirements आहेत.
02:16 Ubuntu Linux 10.04 वर Firefox सुरू करण्यासाठी आपल्याला पुढील लायब्ररीज किंवा पॅकेजेसची आवश्यकता भासेल.
02:24 GTK+ 2.10 or higher
02:29 GLib 2.12 or higher
02:32 libstdc++ 4.3 or higher
02:37 Pango 1.14 or higher
02:40 X.Org 1.7 or higher
02:44 आणि हार्डवेअरमध्ये किमानPentium 4, 512MB RAM आणि हार्डड्राईव्हमध्ये 200MB space असणे आवश्यक आहे.
02:55 System requirements बद्दलची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसत असलेल्या Firefox च्या वेबसाईटवर दिलेली आहे.
03:02 mozilla.com या अधिकृत वेबसाईटवरून Mozilla Firefox डाऊनलोड करा.
03:11 येथे आपल्याला नेहमीच Firefoxचे अद्ययावत version मिळेल.
03:15 किंवा आपण All Systems and Languages या लिंकवरून अधिक पर्याय मिळवू शकतो.
03:23 Mozilla आपल्याला ७० भाषांमध्ये Firefox वापरण्याची संधी देते.
03:28 येथे आपल्यासाठी स्थानिक भाषेनुसार Firefoxचे version डाऊनलोड करू शकतो. उदाहरणार्थ हिंदी किंवा बंगाली.
03:33 तसेच आपण Windows, Mac किंवा Linux च्या आयकॉनवर क्लिक करून operating system देखील निवडू शकतो.
03:42 Ubuntu Linux मध्ये प्रथम फाईल सेव्ह करण्याचे लोकेशन निवडा. डिफॉल्ट रूपात आपल्या होम फोल्डरमधील डाऊनलोडस ही डिरेक्टरी निवडलेली असते.
03:51 आता तुम्ही Save File हा पर्याय निवडून popup window वरीलOk या बटणावर क्लिक करा.
03:58 हे Firefoxच्या archive, होम डिरेक्टरीतील डाऊनलोडस या डिरेक्टरीत सेव्ह होईल.
04:06 टर्मिनल विंडो उघडा आणि डाऊनलोडस या डिरेक्टरीत जाण्यासाठी cd ~/Downloads ही कमांड टाईप करा.
04:17 आता एंटर दाबा.
04:19 डाऊनलोड केलेल्या फाईलमधील घटक Extract करण्यासाठी tar xjf firefox-7.0.1.tar.bz2 ही कमांड टाईप करा.
04:35 आता एंटर दाबा.
04:38 Firefox 7.0 सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या फाईल Extract होण्यास सुरूवात होईल.
04:44 Firefoxच्या डिरेक्टरीत जाण्यासाठी टर्मिनल विंडोवर cd firefox ही कमांड टाईप करा.
04:52 आता एंटर दाबा.
04:54 हे तुम्हाला Firefoxच्या डिरेक्टरीत घेऊन जाईल.
04:58 Firefoxब्राऊजर उघडण्यासाठी ./firefox ही कमांड टाईप करून एंटर दाबा.
05:06 किंवा जर तुमची चालू डिरेक्टरी ही होम डिरेक्टरी नसेल तर firefox उघडण्यासाठी ही कमांड टाईप करा.
05:15 ~ /Downloads/firefox/firefox
05:21 डिफॉल्ट होमपेज सेट कसे करायचे ते आपण नंतर पाहू.
05:25 आता उदाहरणादाखल Rediff.com च्या वेबसाईटवर जाऊ या. ज्यावर ताज्या बातम्या आणि माहिती उपलब्ध आहे.
05:33 मेनूबारखालील Address bar मध्ये www.rediff.com टाईप करा.
05:40 हे rediff.com या वेबसाईटच्या होमपेजवरील घटक दर्शवेल.
05:47 आता आपण या पानावरून विविध लिंकसवर त्यातील घटक बघण्यासाठी नेव्हिगेट करू शकतो.
05:53 Headlines tab च्या खाली पहिल्या लिंकवर क्लिक करा.
05:58 अशा प्रकारे आपण firefox च्या सहाय्याने वेबसाईट उघडू शकतो. आणि नंतर तेथून इतर अनेक पानांवर नेव्हिगेट करू शकतो.
06:05 पुढील ट्युटोरियलमध्ये आपण firefox चे interface आणि इतर वैशिष्ट्यांबद्दल अधिक माहिती करून घेऊ.
06:12 सदर प्रकल्पाची माहिती देणारा व्हिडिओ खालील लिंकवर उपलब्ध आहे.
06:16 ज्यामध्ये तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
06:19 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
06:24 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
06:29 जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
06:33 अधिक माहितीसाठी कृपया spoken hyphen tutorial dot org या संकेतस्थळाला जा.
06:39 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.
06:44 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
06:51 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:02 ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Pratik kamble, Ranjana, Sneha