Difference between revisions of "Advance-C/C2/Command-line-arguments-in-C/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 2: Line 2:
 
| '''Time'''
 
| '''Time'''
 
| '''Narration'''
 
| '''Narration'''
 
  
 
|-
 
|-

Latest revision as of 16:40, 26 September 2019

Time Narration
00:01 Advance – C मधील Command Line Arguments वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात आरग्युमेंटस असलेले मुख्य फंक्शन उदाहरणासहित जाणून घेऊ.
00:15 येथे उबंटु ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 11.10 आणि उबंटुवरील gcc कंपायलरचे 4.6.1 वर्जन वापरणार आहोत.
00:27 या पाठासाठी तुम्हाला C वरील पाठांचे ज्ञान आवश्यक आहे.
00:33 नसल्यास संबंधित पाठांसाठी खाली दिलेल्या वेबसाईटला भेट द्या.
00:39 प्रोग्रॅमनी सुरूवात करण्यासाठी माझी कोड फाईल उघडत आहे.
00:45 'main hyphen with hyphen args.c' हे फाईलचे नाव आहे.
00:50 हा प्रोग्रॅम समजून घेऊ.
00:53 ह्या हेडर फाईल्स आहेत. stdio.h हे core input आणि output फंक्शन्स घोषित करते.
01:01 stdlib.h ही हेडर फाईल- Numeric conversion function

Pseudo-random numbers, Generation function, Memory allocation, Process control functions घोषित करते.

01:16 हे मुख्य फंक्शन आहे. त्यामधे दोन आरग्युमेंटस आहेत.int argc, char asterisk asterisk argv (**argv).
01:28 “argc” हे प्रोग्रॅममधे पास केलेल्या command line arguments च्या संख्येचा संदर्भ घेते.
01:34 यामधे प्रोग्रॅमच्या मूळ नावाचाही समावेश असतो .
01:38 argv मधे index 0 पासून सुरू होणा-या मूळ आरग्युमेंटसचा समावेश होतो.
01:44 Index 0 हे प्रोग्रॅमचे नाव असते.
01:48 Index 1 हे प्रोग्रॅममधे पास केलेले पहिले आरग्युमेंट.
01:53 Index 2 हे प्रोग्रॅममधे पास केलेले दुसरे आरग्युमेंट आणि अशाच प्रकारे पुढे.
01:59 हे स्टेटमेंट प्रोग्रॅममधे पास केलेल्या एकूण आरग्युमेंटसची संख्या दाखवते.
02:05 हे प्रोग्रॅममधे पास केलेले पहिले आरग्युमेंट दाखवेल.
02:09 1 हा अंक index 1 साठीचे आरग्युमेंट दाखवतो.
02:13 'while' condition आरग्युमेंटसची संख्या कमी करत जाईल.
02:18 हे स्टेटमेंट प्रोग्रॅममधे पास केलेल्या सर्व आरग्युमेंटस प्रिंट करेल.
02:23 सर्वात शेवटी आपल्याकडे return 0 स्टेटमेंट आहे.
02:27 Ctrl+Alt+T ही बटणे दाबून टर्मिनल उघडा.
02:35 टाईप करा: gcc space main hyphen with hyphen args.c space hyphen o space args. एंटर दाबा.
02:49 टाईप करा : dot slash args. एंटर दाबा.
02:54 असे आऊटपुट दिसेल: "Total number of arguments are 1". "The first argument is null" "arguments are ./args"
03:06 Command line arguments कार्यान्वित करते वेळी दिल्या जातात.
03:11 Total number of arguments are 1 कारण कार्यान्वित होणा-या फाईलचे नावच शून्यावे आरग्युमेंट आहे.
03:19 The first argument is (null) कारण आपण प्रोग्रॅममधे कोणतेही आरग्युमेंट पास केलेले नाही.
03:26 Arguments केवळ एकच आहे ते म्हणजे dot slash args.
03:31 पुन्हा कार्यान्वित करू.
03:34 अप ऍरोचे बटण दाबा. स्पेस देऊन टाईप करा: Sunday space Monday space Tuesday. एंटर दाबा.
03:47 असे आऊटपुट दिसेल: Total number of arguments are 4 , The first argument is Sunday , Arguments are ./args Sunday Monday आणि Tuesday .
04:04 आऊटपुट समजून घेऊ.
04:06 ./args, Sunday, Monday आणि Tuesday ही एकूण चार आरग्युमेंटस आहेत.
04:14 पहिले आरग्युमेंट हे Sunday आहे.
04:17 शून्यावे आरग्युमेंट नेहमीच कार्यान्वित होणा-या फाईलचे नाव असेल.
04:22 पहिल्या आरग्युमेंटला Sunday प्रदान केले आहे.
04:25 दुस-या आरग्युमेंटला Monday प्रदान केले आहे.
04:28 तिस-या आरग्युमेंटला Tuesday प्रदान केले आहे.
04:31 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. थोडक्यात,
04:37 आपण शिकलो: Command line arguments, argc, argv.
04:45 असाईनमेंट म्हणून हा प्रोग्रॅम वेगवेगळी आरग्युमेंटस देऊन कार्यान्वित करा.
04:51 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
04:54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
04:57 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:02 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:08 ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
05:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
05:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
05:30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
05:36 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana